ड्रीम गर्ल बनून फसवणूक करणाऱ्या आरोपला बेड्या

आरोपींवर फसवणूकीचे २० गुन्हे दाखल आहेत.
ड्रीम गर्ल बनून फसवणूक करणाऱ्या आरोपला बेड्या
ड्रीम गर्ल बनून फसवणूक करणाऱ्या आरोपला बेड्याविकास मिरगणे

ड्रीम गर्ल चित्रपटात हिरो आयुषमान खुराना जसा मुलींचा आवाज काढून पुरूषांना प्रेम जाळ्यात फसवत होता. तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. आरोपी पुरूष महिलेचा आवाज काढून ज्वलर्स मालकांना आणि मेडिकल दुकानदारांची फसवणूक करून त्यांच्याकडचे पैसे लुटत होता. नवी मुंबई पोलीसांनी या दोन आरोपींना अटक करीत त्यांचा खेळ जगासमोर आणला आहे. आरोपींवर फसवणूकीचे २० गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी मनीष आंबेकर आणि अँथोनी तय्यप्पा महिलेचा आवाज काढून लोकांना चुना लावत होते.

हे देखील पहा -

आरोपी हे फोन वर महिलेचा आवाज काढत स्वतः डॉक्टर असल्याचे भासवून मेडिकल मधून औषधांची ॲार्डर करीत होते. आपल्याकडे २ हजारांच्या ५० हजार ते १ लाखा पर्यंत नोटा आहेत. मात्र त्या ऐवजी ५०० रूपयांच्या सुट्या नोटा पाहिजेत असे सांगून पैसे मागवून घेत होते.

ड्रीम गर्ल बनून फसवणूक करणाऱ्या आरोपला बेड्या
Breaking : लाच आणि खंडणी गलिच्छ शब्द; मलिकांविरोधात कोर्टात जाणार : वानखेडे

मेडिकल मालक औषधांची ॲार्डर घेवून हाॅस्पीटल जवळ येताच आरोपी कडून प्रवेशव्दारावर आणलेले पैसे आपल्याकडे द्यायला डॉक्टर मॅडमने सांगितले असल्याचे सांगत ते पैसे आपल्या तब्यत घेत होते. पैसे घेतल्या नंतर हाॅस्पीटल मध्ये जावून तुम्ही औषधे द्या आणि २ हजारांच्या नोटा डाॅक्टर मॅडम कडून घ्या असे सांगितले जायचे. मात्र प्रत्यक्ष हाॅस्पीटल मध्ये गेल्या नंतर आपली फसवणूक झाल्याचे मेडिकलच्या मालकांना कळून यायचे. हीच पद्धत ज्वेलर्स दुकानदारांसोबत  देखील  वापरली जायची.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com