Breaking : लाच आणि खंडणी गलिच्छ शब्द; मलिकांविरोधात कोर्टात जाणार : वानखेडे

मी कधीही दुबईला गेलो नव्हतो, त्यामुळे मालिकांनी ट्विटर वरून ट्विट केलेले फोटो खोटे असून ते मुंबईतीलच असल्याचे सांगत वानखेडे यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
Breaking : लाच आणि खंडणी गलिच्छ शब्द; मलिकांविरोधात कोर्टात जाणार : समीर वानखेडे
Breaking : लाच आणि खंडणी गलिच्छ शब्द; मलिकांविरोधात कोर्टात जाणार : समीर वानखेडे SaamTvNews

मुंबई : मुंबई मधील ड्रग्ज प्रकरण आणि NCB कडून टाकण्यात आलेल्या धाडी आता वेगळ्या वळणावरती येऊन पोहचल्या आहेत. सुशांतसिंग राजपूत, दीपिका पदुकोण, रिया चक्रवर्ती ते आता आर्यन खान, अनन्या पांडे बॉलिवूडच्या ड्रग्ज रॅकेट ला उजेडात आणण्याची कारवाई NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केली. मात्र, हि कारवाई करताना राजकीय दबाव आणि षडयंत्राच्या आधारे एनसीबीकडून हि कारवाई सुरु असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यांनी केले आहेत.

हे देखील पहा :

समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवरून कौटुंबिक पातळीवर घसरले आहेत. समीर वानखेडे व त्यांची बहीण यास्मिन वानखेडे या बॉलिवूडच्या कलाकारांवर दबाव टाकून खंडणी उकळत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे व त्यांची बहीण हे दोघे १० डिसेंबर २०२० रोजी दुबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होते. बाहेर जाऊन त्यांनी बॉलिवूडच्या लोकांवर दबाव टाकला असा आरोपही मलिक यांनी केलाय.

यावर प्रतिक्रिया देत वानखेडे म्हणाले, दुबई संदर्भात मलिकांनी केलेल्या आरोपांचा मी निषेध करतो. नवाब मलिक खोटे बोलत आहेत. नवाब मलिक यांनी ट्विट केलेला फोटो मुंबईतला आहे. मी परवानगी घेऊन मालदीवला माझ्या कुटुंबासमवेत गेलो होतो. मी कधीही दुबईला गेलो नव्हतो, त्यामुळे मालिकांनी ट्विटर वरून ट्विट केलेले फोटो खोटे असून ते मुंबईतीलच असल्याचे सांगत वानखेडे यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Breaking : लाच आणि खंडणी गलिच्छ शब्द; मलिकांविरोधात कोर्टात जाणार : समीर वानखेडे
Nagpur : अलिशान गाडीत पिस्तूल घेऊन फिरत होता कुख्यात आरोपी!

लाच आणि खंडणी गलिच्छ शब्द

देशसेवा करताना मला जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरीही जाईल. मी जर दुबईला गेलो असेल तर माझा व्हिसा आणि तिकीट तपशील तपासून पाहू शकता. मालिकांची माहिती खोटी असून गेल्या पंधरा दिवसांपासून माझ्या बहिणीवर, वडिलांवर आणि संपूर्ण कुटुंबावर होणारे शाब्दिक वार आणि आरोप वेदनादायी असून याविरोधात मी कोर्टात धाव घेणार असल्याचेही वानखेडे म्हणाले.

By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com