पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) आंदोलन करण्यात आले. मागील २ वर्षांपासून कोरोना संक्रमण काळात विद्यापीठ परिसर बंद होता. मात्र, आता मोठ्या संख्येने विद्यार्थी (Students) विद्यापीठ परिसरात परतत आहेत. विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके, लेक्चर व परीक्षा सध्या सुरू आहेत. ऑनलाईन शिक्षणानंतर आता ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू झाले असून विद्यार्थ्यांना अनेक समस्या जाणवत आहेत. विद्यापीठातील सर्व सोयी सुविधांमध्ये बिघाड झाला असून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
हे देखील पहा :
विद्यापीठ प्रशासनाला अनेक वेळा या संदर्भात अभाविपकडून निवेदन देण्यात आले होते. मात्र, विद्यापीठाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप अभावीपकडून करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्व सोयी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविपने आज विद्यापीठ प्रशासन जगावो आंदोलन केले. यामध्ये खालील मागण्यांचा समावेश होता
• हॉस्टेल 100% क्षमतेने सुरु करून पूर्वीची कायदेशीर गेस्ट पद्धत सुरु करावी.
• विद्यार्थिनी हॉस्टेल मधील पाण्याचा तुटवडा तत्काळ सुरळीत करावा.
• विद्यापीठ आवारातील जेवणाची (मुख्यतः भोजनगृह) गुणवत्ता सुधारण्यात यावी.
• विद्यापीठ आवारातील झेरॉक्स सेंटर तत्काळ सुरू करावे.
• वसतिगृहातील व विद्यापीठ परिसरातील इंटरनेट (wifi) चा विस्कळीत वेग सुधारण्यात यावा.
• सर्व वसतिगृहातील Reading हॉल सुरु करण्यात यावे.
• विद्यार्थिनी वसतिगृहात निवास करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांचा निवास बाहेर करावा.
• E-Vehical तत्काळ सुरू करावे.
या मागण्यांचे पत्र प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आंदोलन स्थळी येऊन स्वीकारले. सदर मागण्या ताबडतोब पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन यावेळी विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अभाविप येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा अभाविप प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे (Anil Thombre) यांनी दिला. यावेळी पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल, विद्यापीठ नगर मंत्री प्रसाद शिंदे व इतर अनेक विद्यार्थी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.