ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत, मात्र आपण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही, असं पवार यांनी ठणकावून सांगितलं.
ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..SaamTvNews
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर । रश्मी पुराणिक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता या आंदोलनावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत, मात्र आपण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही, असं पवार यांनी ठणकावून सांगितलं. (Sharad Pawar On St Workers Agitation)

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांकडून (St Workers) अचानकपणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत पवार यांच्या बंगल्यावर दगडफेक केली. तसेच जयश्रीरामचे नारे देत काहींनी चपलाही भिरकावल्या. शरद पवार आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. पवारांच्या घरावर झालेल्या या हल्ल्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, पवारांच्या घरावर अचानकपणे झालेल्या या हल्ल्यानंतर या आंदोलनामागे नेमके कोणाचे डोके आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादीच्या (NCP) प्रमुख नेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. खुद्द शरद पवार यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार म्हणाले, आज जे काही घडलं त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. कारण, नेता चांगला नसला कि कार्यकर्त्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो. हेच आपण आजच्या घटनेतून पाहिलं. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात परंतु अशापद्धतीने टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही.

पुढे बोलताना पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात जे काही सुरु आहे ते योग्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांशी माझे संबंध चांगले राहिलेत. गेल्या ५० वर्षांत एसटी कर्मचाऱयांच्या प्रत्येक अधिवेशनास मी उपस्थिती लावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे. मात्र, याच वेळेस एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्याचे दुष्परिणाम आज दिसले. कारण नसतांना घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्याच्यासमोर निर्माण झाले आहे. दुर्दैवाने यातून काहींना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले.

एसटी कर्मचाऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायला लावणारे नेतृत्वच कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार

शरद पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्या. ज्या नेतृत्वाने एसटी कर्मचाऱ्यांना टोकाचे पाऊल उचलायला लावून आंदोलन ताणण्याचा प्रयत्न केला तेच नेतृत्व या आत्महत्यांस जबाबदार आहे. यातून आलेलं नैराश्य कुठेतरी व्यक्त केले पाहिजे म्हणून आज टार्गेट करण्याचा प्रयत्न करून हा हल्ला करण्यात आला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या सदैव पाठीशी

शरद पवार म्हणाले, आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या सदैव पाठीशी आहोत. पण, चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. जर कोणी चुकीचा रस्ता दाखवत असेल तर त्याला आपण सर्वांनी विरोध केला पाहिजे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com