Navi Mumbai News : चर्चा तर होणारच! नवी मुंबईत रंगला श्वानांचा अनोखा विवाह सोहळा

नवी मुंबईतील अनोख्या विवाह सोहोळ्याची सर्वत्र चर्चा
Navi Mumbai News
Navi Mumbai News Saam Tv

Navi Mumbai News : नवी मुंबईमध्ये एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळतेय. तो विवाह म्हणजे रिओ आणि रिया या श्वानांचा. नवी मुंबईतील सानपाडा मधील गुनीना लॉन या सोसायटीमध्ये हा विशेष विवाह सोहळा संपन्न झाला.

Navi Mumbai News
Rohit Sharma: आधी भविष्यवाणी, मग शतक... तीन दिवसांपूर्वी केलेल्या रोहितच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा

निल भाटीया आणि राजेश सिधानी या कुटुंबाच्या श्वानांमध्ये हा विवाह सोहळा रंगला. या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. अरिओ आणि रिया एक वर्षांपासून मित्र असून त्यांच्या मालकांनी या दोघांचे मोठ्या थाटात लग्न करायचे ठरवले. यासाठी गाडी मधून रिओ आणि रिया यांची जंगी वरात निघाली. मग वराती मंडळींनी संगीताच्या तालावर ठेका धरत वरात लग्नाच्या हॉल पर्यत आणली.

शेवटी भटजीच्या उपस्थितीत मंगलाष्टके अंतरपाट धरून हा विवाह सोहळा अगदी सांस्कृतिक पद्धतीने पार पडला. यावेळी सोसायटी मधील सर्व रहिवाशी आणि श्वान प्रेमींना आपल्या श्वानांसह खास आमंत्रण होते. या लग्नाला (Marriage) एकूण 50 हजार पर्यत खर्च आल्याचे श्वान प्रेमिनी सांगितले.

Navi Mumbai News
Urfi Javed : उर्फीचं टेन्शन वाढलं! भलत्याच कारणामुळे अडचणीत

कारमध्ये बसून आलेले रिओ आणि रिया हे श्वान त्यांच्या लग्नाची निघालेली वरात, बेधुंद होत नाचणारे व्हराडी, भटजीच्या उपस्थितीमध्ये मंगलाष्टके गात लागणारे लग्न, संगीत समारोह, रिसेप्शन हे सार काही साग्रसंगीत या विवाह सोहळ्यात पार पडल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com