Electricity Bill: अंबरनाथमध्ये दुकानदाराला आलं सात लाखांचं वीजबिल!

मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचा महावितरणचा आरोप. वीजचोरी केली नसल्याचा दुकानदाने केला दावा.
Electricity Bill
Electricity BillSaam Tv
Published On

अंबरनाथ : (Electricity Bill) अंबरनाथमध्ये एका दुकानदाराला महावितरणने तब्बल 7 लाखांच वीजबिल पाठवले असल्याचे समोर आले आहे. दुकानदाराने या वाढीव बीलासाठी महावितरणमध्ये तक्रार केली तेव्हा विजेच्या मीटरमध्ये छेडछाड केल्याचा आरोप महाविरणने दुकानदारावर केला आहे.

अंबरनाथमध्ये नवरेनगर परिसरात केतन ग्रेन स्टोअर नावाचं दुकान केतन मोटा यांचे आहे. यांच्या दुकानामध्ये व घरामध्ये महावितरणच्या भरारी पथकाने धाडी टाकल्या. आणि या दोन्ही मीटरमध्ये छेडछाड करुन स्लो करण्यात आल्याचे महावितरणच्या निदर्शनात आले. यावेळी महावितरणने ही छेडछाड कधीपासून आहे याची माहिती काढली.

Electricity Bill
Devendra Fadnavis: माझ्या माहितीचा स्त्रोत मला विचारला जाऊ शकत नाही - फडणवीस

यानंतर महावितरणने मोटा यांच्या घरातील मीटरसाठी साडेतीन लाख आणि दुकानातील मीटरसाठी साडेतीन लाख असे एकुण सात लाखांचे विजबील दिले आहे. हे बिल न भरल्यास वीज कायदा 2003 कलम 135 नूसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेंद्र कलंत्री यांनी दिली.

'आपण मीटरसोबत कोणतीही छेडछाड केलेली नाही. उलट वीजबिल सुद्धा वेळच्या वेळी भरतो. आणि लॉकडाऊनमध्ये दुकान बंद असूनही पूर्ण बिल (Electricity Bill)भरले आहे. महावितरणने आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत हे बिल माफ करण्याची मागणी केतन मोटा यांनी केली आहे.

Edited by- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com