सुशांत सावंत -
मुंबई : भाजप आमदारांनी (BJP MLA) निलंबन मागे घेण्याबाबत अर्ज केल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षाकडून त्या अर्जाची दखल घेण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन मागे घेणार की नाही? याबाबत येत्या ११ जानेवारीला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी आहे. मात्र त्यापूर्वी निलंबन मागे घेतलं जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला असून येत्या सोमवारी विधान भवनात निलंबनाबाबत पुनर्विचार होणार आहे.
भाजपच्या (BJP) त्या निलंबित १२ आमदारांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. भाजपच्या १२ आमदारांना पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते आशिष शेलार, (Ashish Shelar) अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया या आमदारांच निलंबन करण्यात आलं होतं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.