चेंबूरमध्ये चाकूने सपासप वार करून 32 वर्षीय तरूणाचा खून

मध्यरात्री मुंबई मधील चेंबूर या परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केल्याची घटना
चेंबूरमध्ये चाकूने सपासप वार करून 32 वर्षीय तरूणाचा खून
चेंबूरमध्ये चाकूने सपासप वार करून 32 वर्षीय तरूणाचा खूनSaam Tv
Published On

मुंबई : गुरुवारी मध्यरात्री मुंबई मधील Mumbai चेंबूर Chembur या परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादामुळे आरोपीने मृत तरुणाच्या छातीवर आणि पोटात चाकूने जवळपास ५ वार करण्यात आले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की, संबंधित तरुणाचा अवघ्या काही क्षणातच तडफडून मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक arrested करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. मध्यरात्री घडलेल्या हत्येची घटना उघडकीस येताच परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वसीम अब्बास मुखरी असे हत्या करण्यात आलेल्या ३२ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. तो चेंबूर येथील रमाबाई कॉलनी परिसरामधील रहिवासी आहे.

चेंबूरमध्ये चाकूने सपासप वार करून 32 वर्षीय तरूणाचा खून
Nanded: देगलूर विधानसभेसाठी आज मतदान, 12 उमेदवार रिंगणात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वसीम हा गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शौचालयात जात होता. दरम्यान, भालेराव चाळ येथून आरोपी सुमित ओव्हाळ विरुद्ध दिशेने येत होता. दोघेही एकमेकांसमोर येताच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला दोघांतील हा वाद वाढून मोठ्या विकोपाला गेला आहे. यामुळे संतापलेल्या आरोपी सुमित ओव्हाळ याने स्वत: जवळ असलेल्या चाकूने वसीमवर सपासप वार केले आहे. आरोपी सुमित याने वसीमच्या छातीत आणि पोटावर धारदार चाकुने ५ वार केले आहेत.

या हल्ल्यात वसीम घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आहे. यावेळी आसपासच्या लोकांनी वसीमला तात्काळ घाटकोपर या ठिकाणी असलेल्या राजावाडी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. पण येथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुमित ओव्हाळ विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या अवघ्या काही तासामध्येच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकले आहेत.

नेमक्या कोणत्या कारणामुळे दोघामध्ये वाद झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. टिळकनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपी सुमित हा चेंबूर येथील रमाबाई कॉलनीतील रहिवासी असून याअगोदर देखील त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा सविस्तर तपास टिळक नगर पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com