Navi Mumbai News: सावधान! नवी मुंबईत भटक्या कुत्र्यांनी ९२,५३५ जणांचा घेतला चावा; सर्पदंशाची आकडेवारी तर चक्रावणारी

Navi Mumbai News: नवी मुंबईत २०१६ ते २०२३ डिसेंबर आठ वर्षांत शहरात ९२ हजार ५३५ नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेकडे आहे. तर दुसरीकडे दोन वर्षात १६० जणांना सर्पदंश झाले असून उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे.
Navi Mumbai News
Navi Mumbai NewsSaam Digital
Published On

Navi Mumbai News

नवी मुंबईत भटक्या, मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. २०१६ ते २०२३ डिसेंबर आठ वर्षांत शहरात ९२ हजार ५३५ नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेकडे आहे. तर दुसरीकडे दोन वर्षात १६० जणांना सर्पदंश झाले असून उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी दिली आहे. नवी मुंबई शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गेल्या आठ वर्षात ९२ हजार ५३५ नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आहे.

शहर परिसरातील रस्ते, कचराकुंड्या, सिडको वसाहती, गाव-गावठाण, झोपडपट्टी आदी भागांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची महापालिका कर्मचाऱ्यांकडून नसबंदी केली जात आहे. तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहेत. अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये भटकी कुत्री मोकाट फिरत आहेत. त्यामुळे सायबर सिटीतील पालिका रुग्णालयात वर्षाला तब्बल ८ ते १० हजार श्वानदंशाचे रुग्ण दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पालिका हद्दीबाहेरील रुग्णसंख्या जास्त

ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत पालिका हद्दीतील कुत्रे पकडून आणून त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. तसेच, त्यांना रेबीजची लसही दिली जाते. मात्र, श्वानदंश झालेल्या रुग्णांची वर्षभरातील संख्या पाहता महिन्याला किमान शे- दीडशे रुग्ण श्वानदंशासाठी उपचार घेण्यासाठी येत आहेत. ही संख्या फार मोठी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पालिका रुग्णालयात उपचारासाठी पालिका हद्दीबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या ४० ते ५० टक्के आहे. त्यामुळे श्वानदंशाचे पालिका हद्दीबाहेरील रुग्ण अधिक असल्याचे दिसून येते. नवी मुंबई पालिकेला लागून असलेल्या पनवेल शहराचा ग्रामीण भाग, उरण परिसर आणि मुंबईतील मानखुर्द, गोवंडीमधून येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.

Navi Mumbai News
Govt. Job Vacancy: 1.50 लाख तरुणांच्या हाताला मिळणार काम, कुठे मिळेल माहिती? कुठे कराल नोंदणी? जाणून घ्या

भटक्या श्वानांचा अहवाल

२०१६-१७ --१४,५४६

२०१७-१८- -१३,७८३

२०१८-१९ -- १२,२९५

२०१९-२० --१०,४८२

२०२०-२१ --७, ७७२

२०२१-२२ ----९,९६१

२०२२-२३ --१२,६५६

२०२३-२४ --११,०४०

सर्पदंश

२०२२-२३ एप्रिल ते मार्च , ८६ दंश, १ मृत्यू

२०२३ - एप्रिल ते डिसेंबर, ७४ दंश, २ मृत्यू

Navi Mumbai News
Pune Gangster Pared: लास्ट वॉर्निंग! पुण्यात गजानन मारणे, निलेश घायवळसह २००-३०० गुंडांची परेड, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कडक समज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com