म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी, न्यायालयात 3,500 पानांचे दोषारोपपत्र दाखल

म्हाडाच्या अंर्तगत गट अ,ब,क पदांची परीक्षा घेण्याकरिता जी.ए.सॉफ्टवेअर (G.A. Software) टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीची नियुक्ती करण्यात अली होती.
MHADA Exam
MHADA ExamSaam TV
Published On

पुणे : म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी (MHADA exam paper leak case) तीन हजार पाचशे पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. म्हाडाच्या अंर्तगत गट अ,ब,क पदांची परीक्षा घेण्याकरिता जी.ए.सॉफ्टवेअर (G.A. Software) टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीची नियुक्ती करण्यात अली होती. या कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती.

पुणे सायबर पोलीसांनी (Pune Cyber ​​Police) तपास करत, डॉ. प्रितिश देशमुख एजंट अंकुश हरकळ , संतोष हरकळ या तिघां विरोधात प्रथमवर्ग न्यायदंहडाधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयात तीन हजार ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

MHADA Exam
नागपूरच्या क्वेटा कॉलोनीत आढळलेली ती सहा अर्भक, भंगारवाल्याने फेकलेली

म्हाडा (MHADA) पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत एकूण सहाजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये देशमुख आणि हरकळ बंधू यांच्या शिवाय जमाल इब्राहीम पठाण (वय-४७,रा.जळकोट,लातूर), कलीम गुलशेर खान (५२,रा.बुलढाणा), दिपक विक्रम भुसारी (३२,रा.बुलढाणा) या आरोपींना ही अटक करण्यात आली आहे. म्हाडाच्या वतीने गट अ,ब,क या पदांचे परीक्षा घेण्याकरिता जी.एस.सॉफ्टवेअर कंपनी सोबत करार केला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com