नागपूरच्या क्वेटा कॉलोनीत आढळलेली ती सहा अर्भक, भंगारवाल्याने फेकलेली

नागपूरच्या क्वेटा कॉलोनी भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा अर्भक मिळाल्यानं खळबळ उडाली होती.
Nagpur
Nagpurसंजय डाफ
Published On

नागपूर : नागपूरच्या क्वेटा कॉलोनी (Nagpur Quetta Colony) भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा अर्भक मिळाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता पोलीस तपासात हे अर्भक जवळच्याच पुरोहित नर्सिंग होमचे असल्याचं पुढं आलं आहे. शिवाय ही अर्भक सहा वर्षे जुने असून स्त्री रोग तज्ञ डॉ. यशोदा पुरोहित (Dr. Yashoda Purohit) यांनी एका हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सहा अर्भक आणले होती.

मात्र २०१६ मध्ये त्यांचा मृत्यु झाल्यानंतर नर्सिंग होम च्या पुनर्निर्मितीस सुरुवात झाली, त्यावेळी या नर्सिंग होम मधील जुनं साहित्य भंगारात देण्यासाठी गोकुळ पुरोहित यांनी केअरटेकर बिपीन शाहू याला सांगितले होते त्यामुळे नर्सिंग होममधील सर्व साहित्य भंगारवाल्याला विकण्यातं आले असता भंगारवाल्याने भंगारासह बायोमेडिकल वेस्ट आणि अर्भक (Infant) ही घेतले.

Nagpur
15 वर्षाची मुलगी, 18 चा मुलगा,बोहल्यावर चढण्याच्या तयारी असतानाच, लग्नाचा डाव उधळला

दरम्यान आपण घेतलेले अर्भक कामाचे नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने ही अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची माहिती समोर येत असून या घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.. काचेच्या बरणीत असलेले हे अर्भक नंतर एक कचरा विकणाऱ्या व्यक्तीने काचेची बरणी घेऊन हे अर्भक तसेच टाकून दिले असल्याचं दिसत असून याबाबतची सत्यता अधिकच्या तपासानंतर समोर येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com