मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 'या' तलावांमध्ये ५१ दिवसांचा पाणीसाठा, वाचा सविस्तर माहिती

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा वाढला आहे.
Vihar lake mumbai
Vihar lake mumbaisaam tv

सुशांत सावंत

मुंबई :गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी (Rain in Mumbai) कोसळत आहेत. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. रुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवसांत सात तलाव क्षेत्रांत एकूण २७९ मिमी इतका पाऊस पडला. त्यामुळे धरणाती पाण्याची पातळी (water in dam) वाढली आहे. तसेच तुळशी आणि विहार तलावात सर्वात जास्त पाऊस पडल्याची नोंद झालीय.त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात ५१ दिवसांचा पाणीसाठा आहे. दरम्यान, मुंबईला सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.

Vihar lake mumbai
'शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे', आम्हाला पाहायचंय....; प्रवीण दरेकर म्हणाले...

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावात पावसाची नोंद

- तुळशी तलावात सर्वाधिक ९३ मिमी

- विहार तलावात ८५ मिमी

- तानसा तलावात ५४ मिमी

- भातसा तलावात २१ मिमी

- मोडक सागर तलावात २० मिमी

- मध्य वैतरणा तलावात ४ मिमी

- उच्च वैतरणा तलावात २ मिमी

वर्षभरासाठी आवश्यक पाणीसाठा

वर्षभरासाठी तलावात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. या सात तलावांपैकी विहार व तुळशी हे दोन तलाव मुंबईत पूर्व उपनगर भागात असून उर्वरित पाच मोठे तलाव हे मुंबई बाहेर ठाणे जिल्हा परिसरात आहेत. या सात तलावांपैकी सर्वात जास्त म्हणजे एकूण पाणीसाठ्याच्या जवळजवळ ५० टक्के म्हणजे ७,१७,०३७ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा एकट्या भातसा तलावातून केला जातो. तर सर्वात कमी पाणीपुरवठा क्षमतेने कमी असलेल्या तुळशी ( ८,०४६ दशलक्ष लि.) व विहार ( २७,६९८ दशलक्ष लि.) या तलावातून होतो. उर्वरित पाणीपुरवठा हा तानसा १,४५,०८०दशलक्ष लि.), मध्य वैतरणा (१,९३,५३० दशलक्ष लि.), मोडक सागर (१,२८,९२५ दशलक्ष लि.), उच्च वैतरणा (२,२७,०४७ दशलक्ष लि.) या चार तलावांतून होतो.

Vihar lake mumbai
प्रतीक्षा संपली! मुंबईत मान्सून बरसला; राज्यात 'या' भागांसाठी Yellow Alert

तलावात ५१ दिवसांचा पाणीसाठा

सात तलावांत सध्या १,९८,५६८ दशलक्ष लिटर (१३.७२टक्के) इतका पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षांतील ९ व १० जूनच्या तुलनेत यंदा तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडला आहे. मात्र पाणीसाठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत थोडा अधिक आहे. ११ जून २०२१ मध्ये सात तलावात मिळून एकूण १,८२,९०२ दशलक्ष लि.(१२.६४ टक्के) इतका,११ जून २०२० मध्ये सात तलावांत एकूण १,९२,४०७ दशलक्ष लि. (१३.२० टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र तलावात १,९८,५६८ दशलक्ष लिटर इतका (१३.७२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. दररोज होणारा पाणीपुरवठा व शिल्लक पाणीसाठा यांचे गणित केल्यास सदर पाणीसाठा हा मुंबईकरांना पुढील ५१ दिवस म्हणजेच ३१ जुलै २०२२ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे.

...तर पाणीकपातीचे संकट

हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र कधी कधी हवामान खात्याचे अंदाज चुकतात. त्यामुळे जर यंदा अपेक्षित पाऊस न पडल्यास किंवा कमी पाऊस पडल्यास तलावातील एकूण पाणीसाठयाचे गणित केले जाते. त्यामुळे वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेला नाईलाजाने कमी -अधिक प्रमाणात पाणीकपात करावी लागते.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com