BMC News : मुंबईकरांनो ! चार फेब्रुवारीपर्यंत निम्म्या शहराला पाणी पुरवठा हाेणार नाही; जाणून घ्या भाग

भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे आदी काम केले जाणार आहे.
Mumbai, Water Supply
Mumbai, Water SupplySaam TV

BMC News : बृहन्मुंबई महापालिकेतर्फे (BMC) नागरिकांना स्वच्छ व पूरेसा पाणी पूरवठा व्हावा यासाठी जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेणार आहे. त्यामुळे येत्या ३० जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत (एक दिवस) मुंबईतील १२ विभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच दोन विभागात २५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे. दरम्यान २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार. त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम हाेऊ शकताे. तरी नागरिकांनी पाणी (water) जपून व काळजीपूर्वक वापरावे असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता विभागाने केले आहे.

Mumbai, Water Supply
Mumbai News: गाेलमाल है भाई सब गाेलमाल है... फिल्म सिटी दाखविण्याचे बहाण्याने घडवली 'आरे' सफर, दाेघे अटकेत

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी देखील अव्याहतपणे कार्यरत असते. मुंबईकरांना करण्यात येणारा दैनंदिन पाणीपुरवठा हा सुरळीतपणे व्हावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे आणि पाणीपुरवठा प्रकल्प विभागाद्वारे पाणीपुरवठा विषयक सुधारणांची तसेच परिरक्षणाची विविध कामे महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी हाती घेतली जातात.

याच कामांचा भाग म्हणून भांडुप (bhandup) संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती जाणार आहेत.

Mumbai, Water Supply
Kankavali News: कनेडीत राणे - ठाकरे गटात राडा, कुंभवडेचे सरपंच रक्तबंबाळ; पाेलिसांची जादा कुमक तैनात

या कामांच्या अनुषंगाने ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० पासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. तर दाेन विभागातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.

या भागातील पाणी पूरवठा राहणार खंडीत

माळवदे म्हणाले पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या ९ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील. तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील.

Mumbai, Water Supply
Mla Yogesh Kadam News : संजय कदम शिवसेनेत गेले तर त्यांची ही राजकीय आत्महत्या ठरेल : योगेश कदम

या भागात पाणी कपात व पूरवठा राहणार बंद

या व्यतिरिक्त 'जी उत्तर' आणि 'जी दक्षिण' या २ विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात ३० व ३१ जानेवारी २०२३ रोजी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी २०२३ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अधिक सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही कामे हाती घेतली जात आहेत. या कामांमुळे २९ जानेवारी २०२३ तसेच ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपरोक्त विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी पाणीपुरवठा खंडित असण्याच्या कालावधीत व पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याच्या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com