Saam Impact : ऑलिम्पियन प्रवीणच्या कुटुंबियांना मिळाला न्याय

olympain archer pravin jadhav
olympain archer pravin jadhav
Published On

सातारा : या पुढं ऑलिम्पियन प्रवीण जाधव olympain archer pravin jadhav याच्या कुटुंबियांना काेणत्याही प्रकारचा त्रास हाेणार नाही. जे जाधव कुटुंबियांना त्रास देत हाेते त्यांना पाेलिस प्रशासनाने याेग्य ती समज दिली आहे. संबंधितांनी देखील माघार घेतली असून जाधव कुटुंबियांना त्रास हाेणार नाही असे स्पष्ट झाल्याने प्रवीणच्या कुटुंबियांना एक प्रकारे न्याय मिळाला आहे. साम टीव्ही आमच्या पाठीशी खंबीर राहिल्याने आमचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असून सरकारने आम्हांला राहण्यासाठी शेती महामंडळाची जागा द्यावी अशी अपेक्षा प्रवीणचे वडील रमेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.

ऑलिम्पियन प्रवीण जाधव याच्या कुटुंबियांस घर बांधण्यावरुन धमकी दिली गेली हाेती. त्याच्या कुटुंबियांनी वाद नकाे म्हणून गाव साेडण्याचा निर्धार व्यक्त केला. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने विविध फ्लॅटफार्मवर प्रसारित केले. त्याचा पाठपूरावा सुरु ठेवला. त्यानंतर प्रवीणच्या कुटुंबियांच्या पाठीशी एकेक जण ठामपणे उभे राहत गेले. आज (बुधवार) प्रवीणच्या कुटुंबाचा वादाचा प्रश्न निकाली लागला आहे. याबाबत गृहराज्यमंत्रि शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले.

गृहराज्यमंत्रि शंभूराज देसाई म्हणाले प्रवीण जाधव याच्या कुटुंबियांना त्रास देणा-यांना समज दिली आहे. तेथील वादाचा प्रश्न निकाली लागला आहे. हा विषय माझ्याकडे आल्यानंतर मी तातडीने पाेलिस आणि महसूल विभागास सूचना दिल्या हाेत्या. त्याप्रमाणे अधिकारी घटनास्थळी गेले. त्यांनी त्रास देणा-यांना याेग्य ती समज दिली. त्यानंतर संबंधितांनी देखील माघार घेतली आहे. स्वतःच्या जागेत घरबांधत असताना काेणी त्रास दिला तर त्याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी स्पष्ट सूचना करुन देण्यात आली आहे. आज (बुधवार) प्रवीण जाधव याने स्वतः लिहून दिले आहे माझी काेणावरही काेणतीही तक्रार राहिलेली नाही.

olympain archer pravin jadhav
महाराष्ट्रातील 'या' चार जिल्ह्यांत काेराेनाचे संक्रमण थांबेना

क्रीडामंत्रि सुनील केदार यांनीही प्रवीणला न्याय देण्याची भुमिका जाहीर केली. ते म्हणाले जाधव कुटुंबियांच्या सन्मानाला ठेच पाेचली आहे याबद्दल आम्ही काळजी घेऊ आणि याेग्य ताे न्याय दिला जाईल. त्यांना घर साेडून जावे लागणार नाही. मी स्वतः महसूलमंत्रि बाळासाहेब थाेरात यांच्याशी बाेलून घेईन आणि जागेच्या प्रश्न निकाली काढेन असे आश्वासित केले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही प्रतिकुल परिस्थितीमधून वाटचाल करणा-या प्रवीणच्या कुटुंबास सर्वताेपरी मदत केली जाईल असे सांगितले. ते म्हणाले जाधव कुटुंबियांना त्रास देणा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना पाेलिस प्रशासनास दिले आहेत. जाधव कुटुंब अतिशय गरीब आहे. ते हलाखीच्या परिस्थितीत आहेत. तालुक्याचा, लाेकसभा मतदारसंघाचा खासदार या नात्याने त्यांच्या राहण्याच्या जागेचा प्रश्नापासून आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्नशिल राहीन असे आश्वासित केले.

दरम्यान प्रवीणचे वडिल रमेश जाधव यांनी साम टीव्हीने आमचा प्रश्न मांडला. आम्ही आभारी आहाेत असे नमूद केले. ते म्हणाले आमचे सरकारला एवढेच मागणे आहे आम्हांला राहण्यापुरती फक्त जागा द्यावी. सध्याचे क्षेत्र शेती महामंडळाचे आहे. ही जागा आमच्या नावे नाही आणि त्यांच्याही नावे नाही. ही जागा सरकाराने आम्हांला द्यावी. अन्यथा आम्ही चाललाे.

प्रवीण जाधव याच्या आईने देखील साम टीव्ही आमच्या पाठीशी राहिल्याने प्रश्न मार्गी लागला आहे. प्रवीण म्हणाला आम्हांला गावातून यापुर्वी काही मदत झाली नाही. आत्ता आम्हांला मदतीची अपेक्षा हाेती. परंतु ती झाली नाही याची खंत वाटते. आम्हांला केवळ राहण्यापूरती जागा हवी आहे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com