डॉ. माधव सावरगावे
औरंगाबाद : राज्यपाल (Governor) नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादीने (NCP) स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetty) यांचं नाव वगळलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा मी करेक्ट कार्यक्रम करीन, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. शेट्टी यांच्या या वक्तव्यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शेट्टी यांनी ते वाक्य राष्ट्रवादी साठीच वापरलं हे कशावरून, असं सांगत मी शेट्टी यांच्यापेक्षा लहान आहे अशी प्रतिक्रिया दिलीय. आज जयंत पाटील यांनी औरंगाबाद मधील कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यानंतर त्यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.
हे देखील पहा-
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली नाव राज्यपाल यांनी मान्य करावी, अशी विनंती राज्यपालांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल यावर निर्णय घेतील असंही ते म्हणाले.जावेद अख्तर यांच्या वक्तव्याबाबत मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. समाजात ईतर प्रश्न असतात, त्यामुळे अशा प्रश्नांकडे मी दूर्लक्ष करतो, असं सांगत यांनी अख्तर यांच्या वक्तव्याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. औरंगाबादचं संभाजीनगर करण्याबाबत सुभाष देसाई यांच्याशी चर्चा झालेली नाही असं सांगायला देखील जयंत पाटील विसरले नाहीत.
कन्नडमध्ये पिकांचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु आहेत,बेलदरी येथे मातीच्या तलावाची भिंत फुटल्याने या भागात जास्त नुकसान झालं असून या भागातील नुकसानीचा अहवाल सरकारकडे आल्यानंतर सरकार पुढील भूमिका बजावेल,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना मदत करफेनण्यासाठी तातडीनं प्रयत्न केले जाणार असून जमीन खरडून जाण्याचे निकष ठरवण्यात आले आहे.त्या निकषांनुसार जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.बेलदरी येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी सूचना दिल्या आहे, त्याच काम पूर्ण होण्यासाठी 3-4 महिने लागतील असंही ते म्हणाले.
Edited By- Anuradha
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.