नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर (Afganistan) तालिबानने (Taliban) पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर तेथील परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अनेक तज्ञांनी याचा भारतालाही (india) धोका असल्याची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभुमीवर आता भारतातही दहशतवादी हल्ल्याचा (Terrorist attack) अलर्ट गुप्तचर विभागाने (Intelligence department) दिला आहे. यानंतर राजधानी दिल्लीत सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
हे देखील पहा-
मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील इस्रायली यहूदी (ज्यू) नागरिक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. यहूदी सण 6 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पुढील अनेक दिवस चालेल. दिल्लीतील इस्रायली (Israel) नागरिकांना दहशतवाद्यांवर निशाना साधू शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इस्रायली नागरिकांशी संबंधित दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर दहशतवादी हल्ला करु शकतात.
दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या आहेत. यापुर्वीही दहशतवाद्यांनी यहूदी नागरिकांना लक्ष्य केले आहे. जानेवारी 2021 मध्ये इस्रायली दूतावासाजवळ बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. पण सुदैवाने या हल्लात कोणीही जखमी झालं नव्हंत.
काय असू शकतात दहशतवाद्यांचे लक्ष्य?
इस्रायली दूतावास, वाणिज्य दूतावास आणि त्यांचे कर्मचारी, कोशेर रेस्टॉरंट हॉटेल, चाबड हाऊस, ज्यू कम्युनिटी सेंटर, इस्त्रायल पर्यटन स्थळे अशी ठिकाणे आहेत जिथे दहशतवादी हल्ले होऊ शकतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.