युवक नागपुरी खर्रा खाऊन करतायत मजा अन् परिवार भोगतोय कर्करोगाची सजा

जेवणाच्या खर्चापेक्षा खऱ्याचा खर्च अधिक
Yavatmal News
Yavatmal NewsSaam Tv
Published On

संजय राठोड

यवतमाळ - विदर्भात मोठ्या प्रमाणात युवा पिढीचा खर्रा हा दैनंदिन गरज बनली आहे. तंबाखू निकोटिन केशरमिश्रीत या वस्तुंचा खर्च दोन वेळेच्या जेवणाच्या खर्चा पेक्षा महाग आहे. सुगंधित तंबाखू पासून बनवण्यात येणाऱ्या नागपुरी (Nagpur) खऱ्यामुळे तोंडाचा कॅन्सर होऊन जिल्ह्यात आतापर्यंत हजारो संसाराची राखरांगोळी झाली आहे. अशात या जिवघेण्या व्यसनाच्या अहेरी गेलेल्या आणि नागपुरी खऱ्याच्या दलदलीत चिखलातून युवामंडळीना बाहेर काढण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ गुटखा विरोधी कायद्यानुसार गुटखा विक्रीची तपासणी करण्याचे आणि बेकायदेशीर खर्रा मशिन बाळगऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी दिले आहे.

हे देखील पहा -

सुगंधित मजा तंबाखू पासून तयार करून जागो जागी विक्री होत असलेला नागपुरी खर्रा दिवसभररातून किमान चार ते पाच वेळा सेवन केला जातो. साधारणता एक खर्रा तीस ते पन्नास रुपयाला मिळतो दिवसातून पाच खर्रा खाणे म्हणजे ह्याचा खर्च दिडशे ते अडीचशे रूपयांच्या घरात जातो. म्हणजेच जेवणाच्या खर्चापेक्षा खऱ्याचा खर्च अधिक आहे. युवा पिढी ज्या मज्जाच्या खर्रावर पैसे खर्च करतात ती वस्तू शरीरासाठी हानीकारक आहे.तसे सुगंधित तंबाखू व सिगारेटच्या डब्यावर ठळक अक्षरात तंबाखू शरीरास घातक असल्याचे लिहून सुध्दा असते.तरी सुध्दा बिनधास्त पणे तरूण पिढी या व्यसनाच्या अहेरी गेले आहे. दररोज दिडशे ते अडीचशे रूपये खर्च करून खर्रा खाणाऱ्या युवकांच्या संख्येत दिवसं दिवस वाढ होत चालली आहे.

Yavatmal News
भाव खाणारा कांदा पुन्हा रस्त्यावर

आजच्या घडीला खर्रा घेण्यासाठी मोठी रांगा लागलेल्या दिसते. सुगंधित तंबाखू पासून तयार केलेला खऱ्यापासून जिव घेणा आजार होतो, तरी सुध्दा खर्रा या व्यसनाच्या अहेरी हजारो युवक जात आहे. एकंदरीत खर्राचा लागलेला व्यसन युवकाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतांना डोळे लावून खर्रा खाणाऱ्या युवकांनी घरातील नातेवाईकांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. खर्रा खाण्याने तोंडाचा कॅन्सर या सारखा भयंकर आजाराला समोर जावे लागते त्यामुळे युवकांनी खर्रा सारखा व्यसन त्वरीत सोडण्याची गरज आहे. खर्रा खाणाऱ्या युवकांना तिकट,अंबट खाण्याची अर्लजी असल्याचे अनेक तज्ञ डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

नागपूरी खर्रा आणि त्याचे वाईट परिणाम

नागपूरी खर्रा तयार करण्यासाठी मजा नावाची सुगंधित तंबाखू, कोरडा चुना आणि सुपारी एकत्रीत करून मशिन मध्ये बावनवला जातो. खर्रा खाणाऱ्यांना तिकट,अंबाटखाता येत नाही. कालानंतराने तोंडाचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. त्यातच खर्रा खाल्याने दात पिवळे आणि खालून काळे पडतात तसेच दुसऱ्यांसोबत बोलतांना तोंडाची मोठी दुर्गंधी सुटते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com