धक्कादायक : दगडाने ठेचून तरुणाची हत्या, मृत तरुणाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

मृत तरुण राजा भोसले हा आठवडे बाजारात आला असताना त्याच्यावरती अचानक टोळक्याने हल्ला केला आणि त्याला लाट्या काठ्याने दगडाने ठेचून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
धक्कादायक : दगडाने ठेचून तरुणाची हत्या, मृत तरुणाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड
धक्कादायक : दगडाने ठेचून तरुणाची हत्या, मृत तरुणाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोडSaam TV

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातमधील कोपरगाव येथील आठवडे बाजारात एका तरुणाची सात ते आठ जणांच्या टोळक्याने भरदिवसा हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुण राजा भोसले हा आठवडे बाजारात आला असताना त्याच्यावरती अचानक टोळक्याने हल्ला केला आणि त्याला लाट्या काठ्याने दगडाने ठेचून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

धक्कादायक : दगडाने ठेचून तरुणाची हत्या, मृत तरुणाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड
Karad : 25 वर्षीय तरुणीची डोक्यात दगड घालून हत्या; कराड तालुक्यातील धक्कादायक घटना

दरम्यान या हल्ल्यामध्ये राजा भोसले (King Bhosale) हा युवक गंभीर जखमी झाला त्याला कोपरगाव येथील जनार्दन रुग्णालयामध्ये (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं समजताच रुग्णालयाबाहेर जमलेल्या भोसलेच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. दरम्यान सदर घटनेचा घटनेचा कोपरगाव पोलिसांनी पंचनामा केला असून आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com