तुम्ही पोस्टर फाडाल, आक्रोश थांबवू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

'२०१३ मध्ये मोर्चा काढला, त्यावेळी सत्ता परिवर्तन अटळ असल्याचं सांगितलं होतं, त्यावेळी सत्ता परिवर्तन झालं'
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam TV
Published On

औरंगाबाद : पाण्याच्या समस्येसाठी भाजपकडून (BJP) आज औरंगाबादेत महाविकास आघाडीविरोधात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस औरंगाबादमधील पाणी प्रश्नावरुन चांगलेच आक्रमक झाले होते. औरंगाबादकरांचा पाणीप्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

मोर्चादरम्यान, भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंगाबादच्या (Aurangabad) इतिहासातला हा अभूतपूर्व मोर्चा आहे. २०१३ मध्ये मोर्चा काढला, त्यावेळी सत्ता परिवर्तन अटळ असल्याचं सांगितलं होतं, त्यावेळी सत्ता परिवर्तन झालं. शिवसेनेच्या सत्तेत भ्रष्टाचारी यंत्रणा झाली आहे. आम्ही संघर्ष छेडला आहे. हा संघर्ष जो पर्यंत पाणी मिळत नाही तो पर्यंत असणार असल्याचं ते म्हणाले.

हे देखील पाहा -

या बेईमानांच्या बेईमानींने लोकांना तहानलेलं ठेवलं. माझ्या मोर्चाला अटीच अटी टाकल्या. हा जनसैलाब आहे. हा जनतेचा आक्रोश आहे. तुम्ही पोस्टर फाडाल पण आक्रोश थांबवू शकत नाही. वाटाघाटीत टेंडर उशिरा केलं नसतं तर लवकर पाणी मिळू शकलं असतं. महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. टक्केवारी कोणी कीती घ्यायची यावरून भांडणे करीत बसले. या सरकारने फुटकी कवडीही दिली नाही असे आरोप त्यांनी यावेळी केले. तसंच वैधानिक विकास मंडळाचा मुडदा पाडला, वॉटर ग्रीडचा मुडदा पाडला. वॉटर ग्रीडमुळे मराठवाड्याची दुष्काळातून मुक्ती मिळाली असती असही ते म्हणाले. आज संभाजीनगरने महाराष्ट्राला हलवून टाकले आहे. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. तोपर्यंत झोपणार नाही, कुणाला झोपूही देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com