10th Board Exam Paper Leaked : पहिल्याच दिवशी १० वीचा पेपर फुटला, जालन्यानंतर यवतमाळमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा

SSC Exam Paper Leaked : जालन्यामध्ये पहिल्याच १५ मिनिटांत मराठीचा पेपर फुटला होता, त्यानंतर हा पेपर यवतमाळमध्येही व्हायरल जालाय.
SSC Exam Paper Leaked
SSC Exam Paper Leaked
Published On

SSC Exam Paper Leaked : राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडल्याचे दिसत आहे. पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला आहे. जालना आणि यवतमाळमध्ये दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. सोशल मीडियावर मराठीचा पेपर व्हायरल झाला आहे. जालन्यामध्ये पहिल्याच १५ मिनिटांत मराठीचा पेपर फुटला होता, त्यानंतर हा पेपर यवतमाळमध्येही व्हायरल जालाय.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला आहे. मराठीच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिक्षण आणि महसूल विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी येथील शाळेत चौकशी सुरू करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये दहावीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पेपरफुटीचे प्रकरण फक्त जालना आणि यवतमाळ पुरतेच मर्यादीत आहे की राज्य भरात हा पेपर पोहचलाय? याबाबत चर्चा सुरू आहे.

SSC Exam Paper Leaked
SAAM Exclusive : दहावीचा मराठी पेपर १५ मिनिटांत फुटला, २० रुपयांत झेरॉक्स वाटल्या! | VIDEO

दहावीच्या मराठी पेपरला सुरूवात झाल्यानंतर जालन्यातील बदनापूरमध्ये पहिल्या १५ मिनिटात पेपर फुटला. शहरातील झेरॉक्स सेंटरवर फक्त २० रूपयांत पेपर मिळत होता. हा पेपर त्यानंतर सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल जाला. जालन्यानंतर आता यवतमाळमध्येही पेपर फुटल्याचे समोर आलेय. राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय.

SSC Exam Paper Leaked
Saam Exclusive : दहावीचा मराठीचा पेपर फुटला; उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वाटल्या

कॉपीमुक्त अभियानाचा येवल्यातील ग्रामीण भागात फज्जा

अँकर-इयत्ता दहावीच्या परीक्षांना आज सुरुवात झाली असून पहिल्या मराठीच्या पेपरच्या वेळी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. येवल्यातील अनेक केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांची धडपड पाहायला मिळात होती. कॉपी पुरवण्यासाठी विरोध करणाऱ्या शिक्षकांना देखील टवाळखोर दमदाटी करत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले, अशा टवाळाखोरांवर कारवाई करावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

जळगावमध्ये दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉफीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. जळगाव शहरातील अनेक दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीबहादरांकडून सर्रास कॉप्या पुरवल्या जात आहेत. कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सतर्क असल्याचा दावा प्रशासनाकडून कऱण्यात येत आहे. मात्र काही परीक्षा केंद्राबाहेर कॉपी बहाद्दरांकडून सर्रासपणे कॉपी पुरवल्या जात असल्याचे समोर आलेय. काही परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर कॉपी पुरवताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com