Yavatmal Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी तीन तास पायपीट; सुधाकरनगरातील महिलांचा जीवमूठीत घेऊन प्रवास

Yavatmal News : गावात पाण्याचा टँकर येतो, पण त्यातून येणारं पाणी अस्वच्छ आणि गढूळ, वास येणारे आणि आरोग्याला धोका पोहोचवणारं असते. यामुळे तहान भागविण्यासाठी रोज हंडा घेऊन बाहेर पडावे लागत आहे
Yavatmal Water Crisis
Yavatmal Water CrisisSaam tv
Published On

संजय राठोड 
यवतमाळ
: पाण्याचा एक थेंब अमूल्य असतो, पण जेव्हा तो थेंबही मिळत नाही, तेव्हा जीवन जगणं ही एक लढाई ठरते. असाच अनुभव यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर या गावात पाहण्यास मिळत आहे. इथल्या नागरिकांना पाण्यासाठी तीन- तीन तास पायपीट करावी लागत असल्याचे भयानक दृश्य येथे पाहण्यास मिळत आहे. अगदी जीव मुठीत घेऊन पायपीट करत प्रवास करावा लागत आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील सुधाकरनगरमधील महिलांची तहान भागविण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. तरीही तहान काही संपत नाही. गावात पाण्याचा टँकर येतो, पण त्यातून येणारं पाणी अस्वच्छ आणि गढूळ, वास येणारे आणि आरोग्याला धोका पोहोचवणारं असते. यामुळे तहान भागविण्यासाठी रोज हंडा घेऊन बाहेर पडावे लागत आहे. 

Yavatmal Water Crisis
ED Raid : मालेगावमध्ये ईडीची ९ ठिकाणी छापेमारी; बोगस जन्म दाखला प्रकरणी अटकेतील शेखच्या घराचीही झडती

डोक्यावर हंडा घेऊन जीवघेणा प्रवास 

तीव्र पाणी टंचाई असल्याने जंगलातून जाणाऱ्या वाटेवर ठिकठिकाणी मोठमोठाले दगड, घसरडी माती, काटेरी झुडपं आहेत. महिलांना डोक्यावर हंडे घेऊन या वाटांवरून चालावं लागतं. जरासाही तोल गेला, तर थेट दगडांवर आपटण्याची भीती महिलांच्या मनात असते. तसेच अधिक धोकादायक बाब म्हणजे जंगलातील हिंसक प्राणी वाघ, बिबटे आणि इतर वन्यजीव यांचा वावर देखील येथे आहे. त्यामुळे दररोज पाणी भरणं म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करणे आहे. हे सर्व चित्र असल्याने अनेकवेळा पुरुष मंडळी महिलांच्या मागे चालत जातात.

Yavatmal Water Crisis
Kolhapur Crime : दिवसभर यात्रेत पाळणा फिरवायचा, रात्री गावात जाऊन चोऱ्या; तीन सावत्र भावांचा कारनामा उघड

गावच्या दोन टाक्यामध्ये पाणी नाही 

गावात दोन पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र त्या टाक्यात थेंबभरही पाणी नाही. घरोघरी पाणी साठवून ठेवण्याच्या दृष्टीने प्लास्टिकच्या टाक्याच टाक्या उभा असल्याचे पाहायला मिळतात. गावात जी एकमेव विहीर आहे, तीही अनेक महिने झाले पूर्ण कोरडी पडली आहे. पाणीटंचाई इतकी गंभीर आहे की, गावकऱ्यांना पिण्याचं पाणी देखील तीन किलोमीटर दूर असलेल्या विहिरीवरून आणावं लागतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com