Kolhapur Crime : दिवसभर यात्रेत पाळणा फिरवायचा, रात्री गावात जाऊन चोऱ्या; तीन सावत्र भावांचा कारनामा उघड

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. कोल्हापूर पोलीस दलाने घरफोडी करणाऱ्या या तीन अट्टल सावत्र भाऊ असणाऱ्या चोरट्यांना जेरबंद केले आहे
Kolhapur Crime
Kolhapur CrimeSaam tv
Published On

रणजित माजगावकर 
कोल्हापूर
: सध्या गावागावांमध्ये यात्रा सुरु आहेत. या यात्रांमध्ये झुला, पाळणा लावले जात असतात. त्यानुसार यात्रेत दिवसभर पाळणा फिरविण्याचे काम करून मध्यरात्रीनंतर गावात शांतता झाल्यावर घरफोड्या करण्याचा उद्योग सावत्र भाऊ असलेले तिघेजण करत होते. असे साधारण ३२ घरफोड्या करणाऱ्या या तिघा सावत्र भावांना कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. कोल्हापूर पोलीस दलाने घरफोडी करणाऱ्या या तीन अट्टल सावत्र भाऊ असणाऱ्या चोरट्यांना जेरबंद केले आहे. यात रायगड जिल्ह्यातील सलीम महंमद शेख, जावेद महंमद शेख आणि कोल्हापुरातील तौफिक मोहम्मद शेख या तिघा सावत्र भावांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. त्यांनी केलेल्या ३२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून ६७ लाख ४८ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत केला आहे.

Kolhapur Crime
Satara Accident : साताऱ्यात हिट अँड रन; पोलिसाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत एकाला चिरडले, अंगणात झोपले असताना काळाचा घाला

पोलिसांनी वेषांतर करत तिघांना पकडले 

हे तिघेजण दिवसभर यात्रा- जत्रांमध्ये पाळणे फिरवण्याचे काम करून रात्री घरफोड्या करण्याचा या तिघा भावांचा उद्योग होता. घरांवर पाळत ठेवून रात्री घरफोड्या करून या तिघांनी पोलीस दलासमोर एक आव्हान निर्माण केलं होतं. मात्र घरफोडी करणाऱ्या या तिघांना ताब्यात घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात सापळा लावला होता. वेळोवेळी पोलिसही वेषांतर करून या तिघांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेतले आहे.

Kolhapur Crime
ED Raid : मालेगावमध्ये ईडीची ९ ठिकाणी छापेमारी; बोगस जन्म दाखला प्रकरणी अटकेतील शेखच्या घराचीही झडती

६१ तोळे सोने, ४ किलो चांदी जप्त 

तिघा भावांनी मिळून रात्रीच्या वेळेस कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ३२ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून ६१ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ४ किलो ७८७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि घरफोडी करण्यासाठी वापरलेली ३ वाहने आणि हत्यारे असा एकूण ६७ लाख ४८ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल कोल्हापूर पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com