Yavatmal News : विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या चॉकलेटमध्ये निघाल्या जिवंत अळ्या; शालेय पोषण आहाराची पोलखोल

Larvae in students' chocolate : शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चॉकलेटमध्ये चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Larvae in students' chocolate
Larvae in students' chocolateSaam TV
Published On

संजय राठोड, साम टीव्ही यवतमाळ

शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतळमाळ जिल्ह्यातील आर्णीच्या गांधीनगर येथील श्रीमद भारती शाळेत हा प्रकार घडलाय. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला असून सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

Larvae in students' chocolate
Sambhajinagar News : अवघ्या 4 महिन्यांपूर्वी लग्न, पतीचा चारित्र्यावर संशय; डॉक्टर पत्नीने संपवलं आयुष्य

सरकारने यंदा पहिल्यांदाच शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांदुळ न देता मिलेट न्यूट्रिशन बार रागी, ज्वार, बाजरा, अशा तीन वेगवेगळ्या प्रकारचे आहार देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने प्रत्येकी २५ असे तिन्ही मिळून प्रती विद्यार्थी ७५ मिलेट बार देण्यात येणार होते. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात उन्हाळ्यात मिलेट बार दिले.

तर आता तिसऱ्या टप्प्यात चॉकलेटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी (School Student) मोठ्या आनंदात चॉकलेट आपल्या घरी घेऊन गेले. मात्र, यातील काही विद्यार्थ्यांच्या चॉकलेटला बुरशी लागली असल्याचं समोर आलं. याशिवाय काही चॉकलेटमध्ये चक्क तांदळा एवढ्या आकाराच्या अळ्या आढळून आल्या.

महालक्ष्मीनगर (Yavatmal News) येथे वास्तव्यास असलेल्या इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुजफ्फर इकबाल शेख या विद्यार्थ्याने घरी गेल्यानंतर चॉकलेट खाल्ले. पण हे चॉकलेट मळकट लागत असल्याने त्याने याबाबतची माहिती आपल्या वडिलांना दिली. वडिलांनी इतर चॉकलेट उघडून बघताच त्यामध्ये तांदळाच्या आकाराच्या अळ्या आढळून आल्या.

हा सर्व प्रकार पाहून मुजफ्फरच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने शाळा प्रशासनाला यासंदर्भातील माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सकस आहाराच्या नावावर शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप पालकवर्गांकडून करण्यात आलाय.

Larvae in students' chocolate
Weather Alert : मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील 'या' भागात आज तुफान पाऊस; IMD कडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com