संजय राठोड
यवतमाळ - आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून दिवसभर दळणवळणाची सेवा देणाऱ्या एसटी चालक लखपती आत्राम हे सन २००१ पासून महामंडळात कार्यरत आहे. हातात मिळणाऱ्या तटपुंजी पगारामुळे घर कशा चालवायचा असा प्रश्न एसटी चालक आत्राम पुढे पडला आहे.
हे देखील पहा -
एसटी चालक लखपती आत्राम यांच्या पत्नीला २०१६ मध्ये अर्धांगवायूचा झटका येऊन जवळ असलेली जमापुंजी दवाखान्यात खर्च झाली. त्यातही वयात आलेल्या मुलीच्या लग्नाची चिंता आणि त्यांच्या शिक्षण यावर खर्ची. त्यामुळे एसटी चालक असूनही स्वतःच एक घरंट उभारू शकले नाही. अशा गंभीर आणि दयनीय अवस्थेत जिवन जगणारे पडद्या मागील चालक-वाहक अनेक मिळतील. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले संप या कडे सरकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
एसटी चालक लखपती आत्राम यांच्या पत्नीला अर्धांगवायूच्या आजारामुळे त्या खाटेवर पडून असतात.अशात घर काम करण्यासाठी आत्रामच्या सासु बाई हातभार लावतात. आत्राम यांना दोन मुली आहेत. सध्या एसटी चालक आत्रामचा पगार २७ हजार आहे. मात्र पत्नीच्या आजारासाठी कर्ज काढवा लागल्याने सध्याच्या घडीला हातात फक्त सात हजार रुपये येतात. त्यात घर भाडा, मुलींचे शिक्षण आणि घर खर्च काटकसर करून चालवाव लागतो त्यामुळे एसटी चालक लखपती आत्राम पुर्ण खचला आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.