यवतमाळ : वणी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणावर जुन्या वादातून जीवघेणा चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. जुन्या वादातून शाब्दिक वाद आणि वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले. जखमी तरुण तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचताच मारेकऱ्यांनी पाठलाग केला. त्याच्यावर पुन्हा हल्ला (Attack) करणार तेवढ्यात पोलिसांच्या सातर्कतेने पुढील अनर्थ टळला. (Attack On Wani Muncipality Worker)
हे देखील पहा :
ही घटना वरोरा मार्गावरील सिद्धी विनायक मंगल कार्यालयाजवळ घडली. वणी (Wani) नगर पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत अनिकेत मोगरे (21) याला लग्नसमारंभात बँड वाजवण्याचा छंद आहे. आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे तो वरोरा मार्गावरील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात पोहचला. अनिकेत एकटाच असल्याची संधी पाहून आरोपी हरीश रायपुरे हा आपल्या मित्रांसह मंगल कार्यालयात पोहचला. अनिकेत आणि हरीश यांच्यात पुन्हा वाद (Dispute) झाला.
या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी अनिकेतच्या पाठीवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. जखमी अवस्थेत अनिकेतने आपली सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठले. तो पर्यंत जखमी युवकाचे मित्र पोलीस (Police) ठाण्यासमोर जमा झाले. काही वेळातच हल्ला करणारे तरुण सुद्धा पोलीस स्टेशन च्या प्रांगणात पोहचले आणि पुन्हा चाकूने हल्ला करणार तेवढ्यात उपस्थित पोलिसांनी सतर्कता बाळगत आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.