Marathwada Rain Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली, पावसाने विश्रांती घेतल्याने पिकांनी माना टाकल्या

Rain in Maratahwada In August : मराठवाड्यात ऑगस्टमध्ये 85% हून कमी पावसाची नोंद झाली आहे.
Marathwada crops in crisis
Marathwada crops in crisis Saam TV
Published On

Rain Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांता घेतली आहे. पावसाने दडी मारल्याने मराठवाड्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. मराठवाड्यात ऑगस्टमध्ये 85% हून कमी पावसाची नोंद झाली आहे. ज्यामुळे पिके माना टाकू लागली आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत मान्सूनची स्थिती समाधानकारक नाही. यामुळे खरीप पिकांच्या भवितव्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीड आणि लातूरमध्ये ऑगस्टमध्ये सर्वाधिक 92 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर परभणी 91 टक्के, हिंगोली 88 टक्के, नांदेड 85 टक्के, जालना 84 टक्के, उस्मानाबाद 82 टक्के, औरंगाबाद 74 टक्के पावसाची कमतरता आहे.  (Maharashtra News)

Marathwada crops in crisis
Tomato Rate Today: सर्वसामान्यांना दिलासा! टोमॅटोच्या किंमतीत मोठी घसरण; सलग दुसऱ्या दिवशी दर निम्म्याहून घसरले

जुलै महिन्यात पावसाचा प्रमाण समाधानकारक होतं. त्यानुसार 1 जूनपासून या भागात एकूण 13% कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या उरकून घेतल्या होत्या. अधून मधून येणाऱ्या हलक्या पावसावर खरीप पिके डोलू लागली होती.परंतु गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने हजेरी लावली नसल्याने पिकांचं मोठं नुकसाना होत आहे. (Latest Marathi News)

Marathwada crops in crisis
Bhandara News : 47 काेटींच्या पाणीपुरवठा योजनेचा बाेजवारा, टॅंकरमुक्त तुमसर केव्हां हाेणार?

पावसाच्या कमतरतेमुळे मका, सोयाबिन, मुग, उडीद, कपासी, तुर, बाजरीसह इतर पिकांनी कडक उन्हात माना टाकायला सुरूवात केली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने खरीप व रब्बी पिके वाया गेली होती. उन्हाळी पिकेही अतिवृष्टीने वाया गेली होती. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com