
पंढरपूर : पंढरपूरच्या Pandharpur वैभवात भर टाकणाऱ्या अद्यावत अशा नामसंकिर्तन सभागृहाचे Hall काम निधी अभावी रखडले आहे. शासनाने त्वरीत या कामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी नगरपालिकेच्या Municipality नगराध्यक्ष साधना भोसले Sadhana Bhosale यांनी केली आहे. या संदर्भात नगराध्यक्ष भोसले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackeray व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना लेखी निवेदन दिले आहे. दरम्यान हे काम निधी अभावी बंद पडू नये यासाठी पालिकेने पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या आषाढी एकादशी पूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पालिकेने तयारी सुरु केली आहे. Work of 'Namsankirtan' hall in Pandharpur stalled due to lack of funds
हे देखील पहा-
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या Vitthal Rukmini दर्शनासाठी येथे दररोज हजारो भाविक येतात. आषाढी कार्तिकीसह इतर प्रमुख यात्रेला तर लाखो भाविक पंढरीत गर्दी करता. येणाऱ्या भाविकांना भजन,किर्तन आणि इतर अध्यात्मिक कार्यक्रम घेता यावेत यासाठी राज्य शासन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे 40 कोटी रुपये खर्चून अध्ययावत असे नामसंकिर्तन सभागृहाचे काम सुरु केले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्य सरकाने आता पर्यंत या कामासाठी सुमारे 10 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. या कामासाठी नगरपालिका स्वनिधीतून पाच कोटी रुपये देणार आहे. सध्या निधी अभावी हे काम रखडले आहे. उर्वरीत निधी शासनाने तातडीने उपलब्ध करुन द्यावा यासाठी पालिकेने शासन स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत.
दरम्यान मागील आषाढी यात्रेचे शासनाकडे थकीत असलेले पाच कोटी रुपयांचे यात्रा अनुदान पालिकेला मिळणार आहेत. ते पाच कोटी रुपये या कामासाठी उपलब्ध करुन देण्याचा ठराव पालिकेच्या बैठकीत करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजूरीसाठी पाठवला आहे. हा निधी मंजूर झाल्यास तुर्तास हे काम सुरु ठेवता येणार आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.