Ambarnath News: शहरात महिला चोरट्यांचा सुळसुळाट; हातचलाखी सीसीटीव्हीत कैद

सीसीटीव्ही चेक केलं असता याच दोन महिलांनी हातचलाखीने हे पैंजण चोरल्याचं स्पष्ट झालं.
Ambarnath News
Ambarnath News अजय दुधाणे, अंबरनाथ
Published On

अजय दुधाणे

Ambarnath News : अंबनाथमध्ये चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. एका ज्वेलर्स दुकानामध्ये दोन महिलांनी हातचलाखी करत दागिने लंपास केले आहेत. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या बाबत दुकानदाराने पोलिसांत सदर घटनेची तक्रार नोंदवली असून पोलिस या महिलांचा शोध घेत आहेत. (Latest Ambernath Crime News)

प्राप्त माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिमेच्या बांगडी गल्लीत रेडवाल ज्वेलर्स दुकानात ही घटना घडली. या दुकानात दोन महिला आल्या आणि त्यांनी पैंजण दाखवण्यास सांगितलं. त्यानुसार दुकानात काम करणाऱ्या मुलाने आणि २ मुलींने या दोघींना दोन बॉक्समधले पैंजण काढून दाखवले. त्यावेळी पैंजण पायाला लावून निट येत आहेत की नाही या बहाण्याने एक महिला पैंजण घेऊन खाली वाकायची आणि पुन्हा ते पैंजण टेबलावर ठेवून द्यायची.

Ambarnath News
Ambernath Crime: बायको सोडून गेलेल्या मुलाला बाप मारायचा सतत टोमणे; रागाच्या भरात मुलाने बापाचा काटाच काढला

पैंजण बघून झाल्यावर एकही पैंजण पसंत न करता या महिला निघून गेल्या. यानंतर दुकानदाराने दुकानातील स्टॉक मोजला असता त्यात १२ पैंजण कमी असल्याचं आढळलं. त्यामुळं सीसीटीव्ही चेक केलं असता याच दोन महिलांनी हातचलाखीने हे पैंजण चोरल्याचं स्पष्ट झालं. ही महिला ज्यावेळी पैंजण पायाला लावून बघण्यासाठी खाली वाकायची, तेव्हा ती हातचलाखीने एका पैंजणाखाली ४-५ पैंजण लपवून खाली वाकायची. मात्र वर येताना एकच पैंजण घेऊन वर येत टेबलावर ठेवायची.

Ambarnath News
Ambernath : अंबरनाथ गोळीबार प्रकरणी दहा अटकेत; माजी नगरसेवकाचा शाेध सुरु

अशी हातचलाखी करत तिने १२ पैंजण चोरल्याचं स्पष्ट होताच ज्वेलर्स मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. झालेल्या नुकसानामुळे दुकानदार चिंतेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com