कौटुंबिक वादातुन मेव्हणाच्या बायकोने जाळली मोटरसायकल

संपूर्ण घटना सी.सी.टिव्हीत कैद
कौटुंबिक वादातुन मेव्हणाच्या बायकोने जाळली मोटरसायकल
कौटुंबिक वादातुन मेव्हणाच्या बायकोने जाळली मोटरसायकलSaam tv
Published On

उल्हासनगर - मध्ये रात्रीच्या सुमारास घरासमोरील दुचाकीला पेटवून एका महिलेने पळ काढल्याची घटना सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. कौटुंबिक वादातून सदर महिलेने मोटारसायकल पेटवली असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन येथील राम मालीश समोरील परिसरात या महिलेने रात्री घरासमोरील मोटारसायकल पेटवून पळ काढला.

हे देखील पहा -

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मोटारसायकलवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवली आहे. मोटारसायकलने पेट घेतल्याने घरासमोरच आग पसरली. आगीमुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे.

कौटुंबिक वादातुन मेव्हणाच्या बायकोने जाळली मोटरसायकल
आरोग्य विभागाचा गट 'क' चा पेपरही फुटलेलाच; प्रश्‍नपत्रिका घेणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांकडून अटक

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता सदर गाडीला आग लावणारी महिला ही मोटारसायकल मालकाच्या मेव्हण्याची बायको असल्याचे उघड झाले झाले आहे. सदरची घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याची माहिती मोटारसायकल मालक गोपाल शर्मा यांनी दिली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com