Nandurbar Crime News : नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी महिलेचा खून, मनोरुग्ण असल्याचा गैरफायदा घेत नराधमाचा अत्याचार?

dhadgaon news : आज नंदूरबार जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
Nandurbar Crime News, dhadgaon, women molested
Nandurbar Crime News, dhadgaon, women molestedSaam TV
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात एका मनोरुग्ण आदिवासी महिलेचा खून झाल्याची घटना समाेर आली आहे. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान महिलेवर अत्याचार करुन नंतर तिचा नराधमाने खून केल्याची चर्चा शहरात आहे. या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

Nandurbar Crime News, dhadgaon, women molested
Uddhav Thackeray Faction Vs Bjp : उद्धव ठाकरे गटातील महिलांच्या रुद्रावतारापुढे भाजप नेता नरमला, दिले 'हे' आश्वासन

मणिपूर राज्यात महिलांसोबत घडलेल्या घटनेनंतर देशासह राज्यात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. याच घटनेचा निषेध करण्यासाठी नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी समुदायाचा वतीने आज (बुधवार) नंदूरबार जिल्हा बंदची हाक देण्यात आली. त्यास 100 टक्के प्रतिसाद मिळाला असतानाच एक मन सुन्न करणारी घटना नंदूरबार जिल्ह्यात घडली.

Nandurbar Crime News, dhadgaon, women molested
ST Driver Courage : एसटी चालकाचे धाडस पाहून प्रवाशांचे डाेळे पाणावले, 37 जणांचा जीव वाचला (पाहा व्हिडिओ)

धडगाव शहरातील मुख्य बाजारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही महिला मनाेरुग्ण असल्याचे समजते. तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत.

दरम्यान मृत महिलेचा (women) मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर घटनेची स्पष्टता हाेईल. धडगाव पोलिस संशयितांचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com