Antilia बाहेर का ठेवण्यात आली होती स्फोटकांची गाडी? वाचा NIA ची चार्जशिट

एंटेलियाच्या (Antilia) बाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्याप्रकरणी आज एनआयए कोर्टात 10 हजार पानांची चार्जशीट केली सादर केली. ज्यामध्ये सचिन वाझे (Sachin Waze) ने ॲन्टीलिया बाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली याचं कारण देण्यात आलं आहे.
Antilia बाहेर का ठेवण्यात आली होती स्फोटकांची गाडी? वाचा NIA ची चार्जशिट
Antilia बाहेर का ठेवण्यात आली होती स्फोटकांची गाडी? वाचा NIA ची चार्जशिटSaamTv
Published On

मुंबई : एंटेलियाच्या (Antilia) बाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्याप्रकरणी आज एनआयए कोर्टात 10 हजार पानांची चार्जशीट केली सादर केली. ज्यामध्ये सचिन वाझे (Sachin Waze) ने ॲन्टीलिया बाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली याचं कारण देण्यात आलं आहे.

ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात सचिन वाझेला सस्पेंड करण्यात आलं तर मात्र 2020 मध्ये वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं, यानंतर वाजेला एका महिन्यात राखीव पोलिस दलातून क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट (सीआययु) सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर त्याला बसवण्यात आलं आणि वाजेनं मोठ मोठ्या गुन्हयाना हात घालण्यास सुरूवात केली.

सचिन वाझेची ओळख ही एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून होती. मात्र निलंबनामुळे वाजेचं नाव इतिहासात जमा झालं होतं, म्हणूनच नावाचा दबदबा पून्हा मुंबईत करण्यासाठी सोळा वर्षानंतर पून्हा सेवेत आलेल्या वाजेने कारवाईचा धडाका लावला होता. यातूनच प्रसिद्धीसाठी वाजेनं एन्टिलिया स्फोटकांचा कट रचला आणि त्याने टाकलेल्या जाळ्यात तोच अडकला. प्रसिद्धीसाठीच वाजेनं हा कट रचल्याचे एनआयए ने आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे.

हे देखील पहा -

24 फेब्रुवारीच्या रात्री एंटीलिया बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली. हा तपास आपल्याकडेच येणार या आभीरभावातून वाजे निश्चिंत होता. वाजेचा घटना घडल्यानंतर सँण्डविच खाताना एका वरिष्ठ अधिकार्यासोबत झालेल्या बाचाबाचीचा किस्सा ही गाजला होता.

या गुन्ह्यात वापरलेली गाडीही त्याचा मित्र मनसुखची होती. गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार विक्रोळी पोलिस ठाण्यात मनसुखला देण्यासाठीही सचिन वाजेनेभाग पाडलं. त्या गाडीत जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचं पत्र हे वाजेनं स्वत: लिहिलं. हा कट एटीएसने उघडकीस आणल्यानंतर वाजेच्या पायाखालची जमिनच सरकली आणि त्याचं पितळ उघड पडल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

तपासात सचिन वाझे याने मनसुख हिरणला गाडी हरवल्याची तक्रार नोंदवण्यास सांगितलं. मात्र ती स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझे कडेच होती. इतकंच नाही तर, या प्रकरणाचं गांभीर्य वाढवण्यासाठी ही गाडी दहशतवादी संघटन "जैश उल हिंद" कडून ठेवण्यात आल्याचा बनाव सुद्धा सचिन वाझे ने केला.

Antilia बाहेर का ठेवण्यात आली होती स्फोटकांची गाडी? वाचा NIA ची चार्जशिट
सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या; कलाकारांचे संगीतमय निषेध आंदोलन

तपासाची दिशाभूल करण्यासाठी गुजरातहून मोबाइलचे सिमकार्ड मागवले. हत्येनंतर मोबाइल लोकशन मिळू नये म्हणून आरोपी राज्याबाहेर ही पळाले.सगळ्यात आधी गावदेवी पोलीस स्टेशन मध्ये स्फोटकांची गाडी ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता तो नंतर क्राईम इंटेलिजन्स युनिट कडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आणि या गुन्ह्याचा तपास अधिकारी सचिन वाझे झाला.

हे प्रकरण इतकं चिघळेल याची पूर्व कल्पना सचिन वाझे ने केली नव्हती आणि जेव्हा हे प्रकरण हाता बाहेर जाताना सचिन वाझेला दिसल तेव्हा त्याने मनसुख हिरेनवर सर्व आरोप स्वतःवर घेण्यास दबाव आणला. मात्र, मनसुखने जेव्हा हे आरोप स्वतःवर घेण्यास नकार दिला तेव्हा सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या करण्याचा प्लॅन आखला. या प्लॅन मध्ये त्याने सुनील माने आणि प्रदीप शर्माला आपल्या सोबत घेतले आणि यांच्यासोबत मिळून त्यांनी मनसुखच्या हत्येचा कट रचला.

प्रकरण शांत होईपर्यंत मनसुख हिरेनला अंडरग्राउंड होण्याचा सल्ला सचिन वाझेने दिला मात्र या मागचा मुख्य उद्देश मनसुख हीरणची हत्या करणं होतं, सुनील मानेने मनसुख हिरेनला आपल्या गाडीत बसवलं आणि नंतर मनसुख हिरेनला इतर आरोपी संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोटखुरी, मनीष सोनी यांच्या हवाले केलं. ज्यांनी नंतर मनसुख यांची हत्या केली आणि ठाण्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांच मृतदेह टाकून दिला जो नंतर सापडला.

हा गुन्हा करण्यासाठी आरोपीने नवीन मोबाईल फोन,सिम कार्ड वापरले होते जे विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांनी पुरवले होते सचिन वाझे ने त्याचा सहकारी रियाजुद्दीन काजीला सुद्धा सोबत घेतल आणि तपासात जे पुरावे हाती लागले ते सर्व नष्ट करण्यास त्याला सांगितलं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com