सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या; कलाकारांचे संगीतमय निषेध आंदोलन

राज्यात आज सर्व काही खुले झाले आहे. मात्र, कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी का ? असा सवाल करत राज्य सरकारने तातडीने कलाकारांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या; कलाकारांचे संगीतमय निषेध आंदोलन
सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या; कलाकारांचे संगीतमय निषेध आंदोलन विजय पाटील

सांगली : नेहमी स्टेजवर आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांना आज सांगलीमध्ये भर रस्त्यावर उतरून कला सादर करण्याची वेळ आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवर असणारी बंदी उठवण्याच्या मागणीसाठी सरकारच्या निषेधार्थ कलाकारांनी संगीतमय पद्धतीने निषेध नोंदवत आंदोलन केले आहे.

हे देखील पहा -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. थिएटर,नाट्यगृह व इतर सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे स्थानिक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध म्हणून सांगली मध्ये आज कलाकार संघटना भाजपा संस्कृतीला आघाडीच्या वतीने अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या; कलाकारांचे संगीतमय निषेध आंदोलन
इंधन दरवाढीचा निषेध; राष्ट्रवादी महिला आघाडीने पंतप्रधानांना पाठवल्या गोवऱ्या

शहरातील मारुती चौक परिसरात कलाकारांनी रस्त्यावर उतरून गाणी सादर करत संगीतमय पद्धतीने निषेध आंदोलन केलं. राज्यात आज सर्व काही खुले झाले आहे. मात्र, कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी का ? असा सवाल करत राज्य सरकारने तातडीने कलाकारांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com