Who is Sadanand Kadam: साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले सदानंद कदम आहेत तरी कोण?

Dapoli Sai Resort Scam : दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी उद्योजक सदानंद कदम यांना शुक्रवारी ईडीने अटक केली होती. त्यानंतर आता त्यांना कोर्टाने १५ मार्चपर्यत ईडी कोठडी सुनावली आहे.
who is sadanand kadam?
who is sadanand kadam?saam tv
Published On

Sadanand Kadam ED Custody : दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी उद्योजक सदानंद कदम यांना शुक्रवारी ईडीने अटक केली होती. रत्नागिरीच्या खेडमधील कुडोशी येथील अनिकेत फार्म हाऊसमधून ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आता त्यांना कोर्टाने १५ मार्चपर्यत ईडी कोठडी सुनावली आहे.

कोण आहेत सदानंद कदम?

सदानंद कदम हे आप्पा कदम म्हणून खेडमध्ये प्रसिद्ध आहेत. सदानंद कदम रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील उद्योगपती आहेत. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार देखील आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सातत्याने आरोप केले होते. याच साई रिसॉर्ट प्रकरणात सोमय्यांकडून सदानंद कदमांचंही नाव जोडण्यात आलं होतं. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे सख्खे धाकटे बंधू आहेत. परंतु दोघांमध्येही अनेक कारणांवरुन वाद आहेत.

who is sadanand kadam?
Sadanand Kadam : सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी, मनी लॉंड्रीन्ग झाल्याचं कोर्टानं केलं मान्य

सदानंद-रामदास कदम यांच्यात काय वाद?

शिवसेना नेते रामदास कदम 1995 मध्ये राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार आल्यानंतर मंत्री झाले. त्याचा त्यांना सदानंदत कदम याच्याशी असलेल्या व्यवसायातील स्पर्धा मिटवून जम बसवण्यासाठी उपयोग झाला. याच काळात अनिल परब यांच्याशी सदानंद कदम यांची सलगी वाढू लागली. (Latest Marathi News)

परंतु त्यानंतर 2003-04 मध्ये खेड एसटी स्टँडच्या बाजूला सदानंद कदम यांनी अनिकेत शॉपिंग सेंटर हे भव्य तीन मजली शॉपिंग सेंटर सुरू केलं. याच सुमारास सख्खा भाऊ असलेल्या रामदासभाईंशी काही कारणांने त्यांचे खटके उडू लागले आणि दोन भावांमधले अंतर वाढत गेले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या अनिल परब यांच्याशी मैत्री आणि माजी मंत्री असलेले सख्खे भाऊ रामदास कदम यांच्याशी शत्रुत्व या दोन्हींमुळे सदानंद कदम ‘ईडी’च्या कचाट्यात सापडल्याच्या चर्चा आहेत.

who is sadanand kadam?
H3N2 Influenza: काळजी घ्या! नव्या संसर्गाने वाढवलं टेंन्शन; गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, नीती आयोगाचं आवाहन

कदमांवर का करण्यात आली कारवाई?

मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केली आहे. अटक करण्याआधी सदानंद कदमांची ईडीने चार तास कसून चौकशी देखील केली. साई रिसॉर्टशी संबंधित सदानंद कदम आणि अनिल परब यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या आरोप केला गेला. या संशयावरुन ही चौकशी सुरू आहे. (Latest Political News)

सदानंद कदम राजकारणात फार सक्रिय नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेसाठी सदानंद कदम यांनी मोठी ताकद लावल्याचं बोललं गेलं. एकेकाळी रामदास कदमांसोबत असलेला संजय कदम यांनी खेडमधील सभेत ठाकरे गटात प्रवेश केला. संजय कदम यांच्या ठाकरे गटात प्रवेशामागे सदानंद कदमांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याची चर्चा आहे.

खेडमध्ये आता रामदास कदम विरुद्ध संजय कदम अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शत्रूचा शत्रू मित्र याप्रमाणे संजय कदम आणि सदानंद कदम यांचं नातं असल्याची कुजबूज आहे. उद्धव ठाकरेंची खेडमधील सभा होऊन आठवडा उलटत नाही, तोच संजय कदम यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com