
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपी आणि पोलिसांची भेट झाली होती. त्यानंतर वाल्मिक कराड एका नेत्याच्या फार्म हाऊसवर भेटला होता. इतकंच नाही तर कराड शपथविधी सोहळ्याला सुद्धा गेला होता, तिथे त्याला अटक का झाली नाही? असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. गुरुवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी हे गंभीर आरोप केले आहे.
इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची देखील होती, असा थेट गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत खासदार बजरंग सोनवणे यांनी आज धक्कादायक दावा केला आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. इतकंच नाही तर शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर होता, असाही आरोप बजरंग सोनावणे यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या परळीतून पुणे मग गोवा, पुन्हा पुणे या सगळ्या प्रवासादरम्यान पोलीस काय करत होते? तेव्हा त्याला का पकडलं नाही? असा प्रश्न देखील बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना बजरंग सोनवणे यांनी म्हटलं की, मुंडे यांच्या अनुपस्थित परळीतील त्यांचं सगळं काम वाल्मिक कराडच बघतो. त्यामुळे आता कराडला हत्या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाल्मिक कराडने दोन दिवसांपूर्वी एका गाडीतून पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर केलं. तीच गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोग येथे देशमुख कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात देखील होती, असा गंभीर आरोप सोनवणे यांनी थेट अजित पवार यांच्यावरच केला आहे. याचा अर्थ काय? ही गाडी कोणाच्या नावावर आहे? पोलिसांनी त्याला तेव्हाच अटक का केली नाही? असे प्रश्न देखील आता बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केले आहेत.
आमच्या खंडणी गोळा करण्याच्या कामात अडथळा निर्माण केला, तर काय होतं हे दाखवण्यासाठी संतोष देशमुख यांना असं मारण्यात आलं आहे. ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा हा आरोपी परळीत होता. हत्या झाल्यानंतर आरोपी आणि पोलिसांची भेट सुद्धा झाली होती. गेल्या मे महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर हे सगळं घडलं नसतं, असाही दावा बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.