Weather Update : कुठे थंडी तर कुठे पावसाच्या सरी; वाचा पुढील दिवसांचा हवामान अंदाज

देशात वेगवेगळ्या ठिकाणी वातावरणात बदल जाणवत असल्याने एकीकडे थंडी तर दुसरीकडे पाऊस असे दृश्य पाहायला मिळत आहे.
Weather Update
Weather UpdateSaam TV

Weather Update : देशात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. अशात वातावरणात थोडा बदल देखील होत आहे. कधी ढगाळ तर कधी धुके अशी स्थिती निर्माण होत आहे. तसेच काही ठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. राज्यात थंडीचा चांगलाच तडाखा बसला असून आता शेकोट्यांचा आसरा घेताना नागरिक दिसत आहेत. देशात वेगवेगळ्या ठिकाणी वातावरणात बदल जाणवत असल्याने एकीकडे थंडी तर दुसरीकडे पाऊस असे दृश्य पाहायला मिळत आहे. (Latest Weather Update News)

उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. यामुळे अनेक व्यक्तींना सर्दी, खोकला झाला आहे. दुसरीकडे दक्षिण भारतात याच्या उलट दृश्य आहे. इथे हिवाळ्यात नागरिक स्वेटर नाही तर छत्री वापरत आहेत. कारण या भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच ढगाळ वातावरण कायम आहे.

तमिळनाडू राज्याबरोबर दक्षिण किनारपट्टी, पूर्व आसाम, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पाऊस पडत आहे. तसेत केरळ, नागालॅंड, कर्नाटक इथे देखील पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पुढचे काही दिवस थंडीचा आणखीन तडाखा बसण्याची शक्यता हवामानखात्याने वर्तवली आहे. काश्मीरमध्ये तापमान -४ पर्यंत पोहचले असून रसत्यावर पाणी गोठलं आहे.

Weather Update
Nagpur Cold: विदर्भ गारठला,तपमानात घट,गुलाबी थंडीत नागरिकांचा व्यायामावर भर

यानुसार थंडी आणखीन वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली आणि पंजाब या ठिकाणी पुढील २४ तास महत्वाचे असणार आहेत. या ठिकाणी जास्त प्रमाणात धुके पसरण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, पुणे (Pune) औरंगाबादमध्ये थंडी आणखीन वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने सांगितली आहे.

Weather Update
Cold : सतत नाक गळतय ? तज्ज्ञांची 'ही' टिप येईल कामी !

सध्या रब्बी पिकांचे हंगाम सुरू आहे. त्यामुळे थंडीचे वातावरण पिकांसाठी चांगले असल्याने शेतकरी सुखावले आहेत. वाढत्या थंडीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू, मक्का अशा पिकांवर शेतकरी जास्त नफा मिळवू शकतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com