साखर कारखान्याचे केमिकल मिश्रित सांडपाणी; गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत

हजारो नागरिकांच्या व जनावरांच्या जीविताशी खेळ
Beed
Beedविनोद जिरे
Published On

बीड: बीडच्या माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव या दीड हजार लोकवस्तीच्या गावात, आज पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याची देखील पंचाईत झाली आहे. याचं कारण गावालगतच (village) असलेला जय महेश NSL शुगर साखर कारखान्याचे (NSL Sugar Factories) केमिकल मिश्रित सांडपाणी गावालगत नाल्यात सोडल्याचं.. ते सांडपाणी थेट गावाला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या सार्वजनिक विहिरी जवळ येऊन साचले आहे. हेच पाणी विहिरीत पाझरल्याने संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत काळ पाणी येत आहे. तसेच हे पाणी पिले, तर यामुळे जुलाब, मळमळ, आणि पाणी आंघोळीसाठी वापरली तर अंगाला खाज व इतर त्रास होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितलं आहे.

हे देखील पहा-

यामुळे अक्षरशः पिण्याचे पाणी आणि आंघोळीसाठी पाणी आणावे लागत असल्याचे देखील गावातील महिला सांगत आहेत. यातच मोठ्या माणसांचे कसही चालेल. मात्र, लहान मुलांना मोठा त्रास होत आहे. असे महिलांनी सांगितले आहे. दूषित पाण्याचा वास येत असल्यामुळे जनावर हे पाणी पीत नाहीत. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.आम्हाला देखील आंघोळ करताना नाविलाजाणे पाणी घ्यावे लागते. तर यामुळं अंगाला खाज सुटली आहे. त्याबरोबरच इतरही त्रास होत आहेत. पाणीपुरवठाच्या विहिरी जवळचा सांडपाणी सोडल्यामुळे, हेच पाणी विहिरीत येत आहे.

दूषित झालेले पाणी गावाला (village) अपायकारक असल्यामुळे ते सोडावे कसे? त्यामुळे २ महिन्यापासून मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांना (villagers) पाण्यासाठीचा त्रास होत आहे. असे खरात आडगावचे पाणी पुरवठा कर्मचारी सचिन रासवे यांनी सांगितले आहे. गेल्या २ महिन्यापासून गावाला पाणीपुरवठा करणारा विहिरीच्या शेजारी जय महेश शुगर फॅक्टरीचे केमिकल मिश्रित सांडपाणी सोडले आहे. यासंदर्भात वारंवार कारखाना प्रशासनाला पत्र निवेदन देऊन कळवले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असून आज गावाला पिण्याच्या पाण्याची आणि आंघोळीच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही जनावरे देखील हे केमिकल मिश्रित पाणी पिल्यामुळे दगावले आहेत. असे गावचे सरपंच सिताराम सळे यांनी यावेळी सांगितले आहे.

Beed
Breaking: रश्मी शुक्ला यांना दिलासा...

खरात आडगावच्या दूषित पाण्याच्या संदर्भात जय महेश कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक गिरीश लोखंडे यांना विचारले असता कारखाना मोठा आहे. पाणी कुठे कुठे जाते पाहावं लागेल, असे बेजबादार उत्तर दिले आहे. तसेच कॅमेरावर बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान जय महेश साखर कारखान्याचे केमिकल मिश्रित सांडपाणी पाणीपुरवठ्याच्या विहिरीत आल्यानंतर देखील कारखाना प्रशासन काहीच उपाय योजना करत नाही. प्रशासन एखाद्याचा बळी जाण्याची वाट पाहते आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे कारखाना प्रशासनाची ही मुजोरी नागरिकांच्या जिवाशी खेळणारी आहे. म्हणून या कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com