'पटोले बोलू शकतात, आम्ही नाही, आम्हाला सरकार चालवायचं आहे'; शरद पवारांचा पटोलेंना टोला

काँग्रेसच्या निर्णयांचे सर्व अधिकार दिल्लीला होते, मात्र आता ते चंद्रपुर गोंदिया नागपूर-भंडारा या भागात आल्याची माहिती नाही, असा चिमटा पवारांनी पटोलेंना काढला.
Sharad Pawar/ Nana Patole
Sharad Pawar/ Nana PatoleSaamTV
Published On

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गडचिरोली मध्ये पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी राज्य शासनाची पाठराखन करत राज्यातील ST कर्मचाऱ्यांचा संप आणि दंगलीवरती भाष्य केलं आहे. (We want to run the government - Sharad Pawar)

हे देखील पहा -

पवार म्हणाले ' अनेक दिवसांपासून राज्य सरकारविरुद्ध जनमत तयार केले जात होते आणि त्याला प्रतिसादही मिळत होता. नक्षल हा सामाजिक-आर्थिक विषय आहे. तो संपवायचा असेल तर विकास आवश्यक आहे. या भागात दळणवळणाची साधने नाहीत. ही मोठी उणीव आहे. पण त्यावेळी आम्ही बीआरओ ची नेमणूक करून इथले रस्ते तयार केले' असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, 'गडचिरोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले 'नाना पटोले बोलू शकतात; आम्ही बोलू शकत नाही, आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे, असा टोला पटोले यांना लगावला. तसेच काँग्रेसच्या (Congress) निर्णयांचे सर्व अधिकार दिल्लीला (In Delhi) होते, मात्र आता ते चंद्रपुर गोंदिया नागपूर-भंडारा या भागात आल्याची माहिती नाही, असा चिमटाही त्यांनी पटोलेंना काढला.

Sharad Pawar/ Nana Patole
ST Strike : ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावं हीच काँग्रेसची भूमिका - नाना पटोले

त्रिपुराच्या (Tripura) घटनेची महाराष्ट्रात प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नव्हती. कायदा हाती घेण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाद्वारे समाजासमाजात विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न झाला असल्याचही पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com