सरकारी पाहुण्यांची चिंता आम्हाला नाही- शरद पवार

सोलापूरमध्ये राष्ट्रादीचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे
सरकारी पाहुण्यांची चिंता आम्हाला नाही- शरद पवार
सरकारी पाहुण्यांची चिंता आम्हाला नाही- शरद पवार Saam Tv

सोलापूर : सोलापूरमध्ये राष्ट्रादीचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्याकडून होणारा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसत आहे, असा टोला पवार यांनी लगावला आहे. आजचे केंद्र सरकार देशातील रेल्वे स्थानकांचं खासगीकरण करण्याचं काम करत आहे. नेहरूंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्याकरिता भर देण्यात आला. मात्र, मोदी सरकार सर्व गोष्टी व्यापाऱ्यांच्या हातात देत आहेत. बंदरं, विमानतळं, दळणवळणाची साधने या सर्व गोष्टींच्या खासगीकरणाचे प्रयत्न केंद्राचे सुरू आहेत, असे पवार म्हणाले.

बऱ्याच दिवसानंतर मी आज सोलापूरला आलो आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माझी मोठ्या प्रमाणात पळापळ सुरु होती. अनेक लोक पक्ष सोडून गेले होते. परंतु, तरुण कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता दिसून येत होती. काका- पुत्यांच्या विरोधात भूमिका घेण्याची सुरुवात सोलापुरातून केली होती. त्यावेळी एक चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात रंगली होती. भाजपा चवराज्य येणार पण आज उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या नेतृत्वात सरकार आले आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्याचा उपयोग वेगळ्या पद्तीने होत आहे. असे पवार यांनी म्हटले आहे.

हे देखील पहा-

देश ब्रिटिशांच्या साम्राज्यात होता. त्यावेळेस सोलापूर हा हुतात्माचा शहर म्हणून ओळखला जात होता. जवाहरलाल नेहरूनी या देशात पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी प्रयत्न करत होते. आजच केंद्र सरकार हे रेल्वे लाईन, स्टेशनंच खासगीकरण केलं जातं आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढवलं जात आहे. यावर केंद्र सरकाराची नीती महागाईला निमंत्रण देणारी आहे, असा खोचक टोला लगावला आहे.

सोलापूर जिल्हा हा एकेकाळचा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल जात आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी गाड्या घातल्या आहेत. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांबद्दल काय आस्था नाही. शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून भाजपा कार्यकर्त्यानी शेतकऱ्यांची हत्या केली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांची हत्या करण्याचा निर्णय घेणाऱ्या या भाजप सरकारचा विरोध करण्यासाठी भारत बंदचा निर्णय घेतला आहे.

सरकारी पाहुण्यांची चिंता आम्हाला नाही- शरद पवार
Aurangabad: कर्णबधिर आजी समोरच तिन्ही मुलं बुडाली, मृतदेहाचा शोध सुरूच

भाजप सोडून इतर पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न सर्वपक्ष एकत्र मिळून सन्मानाची वागणूक मिळाली असली, तरी एकत्र नायतर स्वतंत्र निवडणूक लढणार आहोत. यावेळेस 50 % जागा आता महिलांना महापालिकेत दिले जाणार आहे. या पद्तीचा शरद पवारांनी सोलापूर महापालिकेत स्वबळाचे संकेत दर्शवले आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीची जर सत्ता आली, तर सोलापूरला मला जुने दिवस दाखवायचे आहेत.

पुण्यात जसे हिंजवडी, मगरपट्टा या ठिकाणी आय टी सेंटर आल्यामुळे सर्व अर्थकारण बदले आहे. त्या पद्तीने जे हिंजवडीला होऊ शकते? सोलापूरला का होऊ शकतं नाही. आपले पालकमंत्री व्यावसायिक असल्याने त्यांना व्यवसायाचा चांगला अनुभव आहे. काल अजित पवारांकडे सरकारी पाहुणे येऊन गेले आहेत. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या अगोदर मला इडीची नोटीस दिली आणि महाराष्ट्राने त्यांना येडी ठरवले आहे. महापालिका निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला जाणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com