अभिजीत सोनावणे, नाशिक
Nashik News: यावर्षी मान्सूनचे (Monsoon 2023) उशीरा आगमन झाले. त्यात जुलै महिना अर्धा पूर्ण झाला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिक चिंतेत आला आहे. कारण जोरदार पाऊस पडत नसल्यामुळे राज्यातील धरणातील पाण्यासाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीकपातीचे संकट आहे. नाशिकमध्ये देखील तिच परिस्थिती आहे. ऐन पावसाळ्यात नाशिककरांवर पाणी कपातीची (Nashik Water Crisis) टांगती तलवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट ओढावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अर्धा जुलै महिना सरला तरीही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला नाही. येत्या ८ दिवसांत नाशिकमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीकपातीचा प्रस्ताव आयुक्तांकडे ठेवण्यात येईल. या प्रस्तावाद्वारे पाणीपुरवठा विभाग आयुक्तांना आठवड्यातून २ दिवस पाणीकपात करण्यात यावी असे सांगेल.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (gangapur dam) सध्या फक्त ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी १८ जुलैला गंगापूर धरणात ७२ टक्के पाणीसाठा होता. दारणा आणि मुकणे धरणातही मागील वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. अशामध्ये नाशिककर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळा सुरू होऊनही अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात नाशिककरांवर पाणीबाणीची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढच्या ५ दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने मुंबईसह तब्बल १७ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ही जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.