Sambhajinagar : संभाजीनगर शहरातील अनेक वसाहतीत आजही पाण्याचा ठणठणाट, टँकरची मागणी वाढली

नवीन जलवाहिनीच्या कामासाठी घेतलेला शट डाऊन शहरवासीयांना चांगलाच महागात पडला. दुरुस्तीसाठी सलग चार दिवस लागल्याने शहरातील बहुतांश जलकुंभ हे कोरडे पडले होते.
water scarcity in parts of sambhajinagar
water scarcity in parts of sambhajinagarSaam TV
Published On

- रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

तब्बल दहा दिवसानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. दरम्यान शहरातील अनेक वसाहती अजूनही टँकरवरच अवलंबून असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वसाहतींचा पाणी पूरवठा कधी सुरळीत हाेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगर शहराला मुबलक प्रमाणात पाणी आणण्यासाठी ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची टेस्टिंग करण्यासाठी गत आठवड्यात १० तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता. गुरुवारी पाणीपुरवठा सुरू झाला असतानाच फारोळ्यात जलवाहिनी निखळली. ती सुरू करण्यास रात्र झाली आणि शुक्रवारी फारोळ्यातच जुनी १२०० मिमीची जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला.

water scarcity in parts of sambhajinagar
Maratha Aarakshan : ... तर आमदारांना डाेक्यावर घेऊन नाचणार अन्यथा त्यांना पाडणार : माथाडी कामगारांचे एपीएमसीत आंदाेलन

नवीन जलवाहिनीच्या कामासाठी घेतलेला शट डाऊन शहरवासीयांना चांगलाच महागात पडला. दुरुस्तीसाठी सलग चार दिवस लागल्याने शहरातील बहुतांश जलकुंभ हे कोरडे पडले होते. त्यामुळे सिडको भागातील बहुतांश परिसरात 10-12 दिवसाच्या खंडानंतर पाणी वितरण करण्यात आले. (Maharashtra News)

मात्र गुंठेवारी भागातील टँकरचा पाणीपुरवठा बंदच होता. छत्रपती संभाजीनगर शहराचा गेल्या दहा ते पंधरा वर्षात चोहोबाजूंनी झपाट्याने विस्तार जरी झाला असला तरी देखील शहरातील अनेक वसाहती अजूनही टँकरवरच अवलंबून असल्याचे चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

water scarcity in parts of sambhajinagar
Success Story : काेराेना काळात नाेकरी गेली, पठ्ठ्याने हार न मानता द्राक्षच्या पंढरीत फुलवली सफरचंदाची बाग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com