Nashik : नाशकात पाणीबाणी, शंकर नगर परिसरातील महिलांचे महापालिका विराेधात हंडा आंदाेलन

पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच शंकर नगर परिसरातील नागरिकांच्या नळाला अद्यापही पाणी येऊ शकले नसल्याचा आरोप देखील यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
water scarcity in nashik shankarnagar area resident andolan
water scarcity in nashik shankarnagar area resident andolansaam tv
Published On

- तबरेज शेख

Nashik :

नाशिक शहरातील शंकरनगर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर दूर जावे लागत असल्याने परिसरातील महिला आक्रमक झाल्या आहेत. या भागातील महिलांनी आज (मंगळवार) डोक्यावर रिकामे हंडे ठेवत महापालिकेच्या विराेधात हंडा आंदाेलन छेडले. यावेळी महिलांनी महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या मखमळाबाद परिसरातील शंकरनगर येथील नागरिकांना अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर दूर असलेल्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी उन्हाच्या झळा सोसत पायपीट करावी लागते. डोक्यावर हंडा घेऊन विहिरीतून पाणी आणावे लागते. यामुळे येथील महिलांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पालिका प्रशासनाच्या विरोधात हंडा आंदोलन केले.

water scarcity in nashik shankarnagar area resident andolan
Washim Fire News : आसोला, नेतंसामध्ये आगीच्या घटना, संसारपयोगी वस्तूंसह शेतीचे साहित्य जळून खाक

यावेळी भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर काकड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेत पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच शंकर नगर परिसरातील नागरिकांच्या नळाला अद्यापही पाणी येऊ शकले नसल्याचा आरोप देखील यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com