Water Problem : राज्यात पाणीसंकट गडद! राज्यातील प्रमुख धरणाची काय आहे स्थिती? जाणून घ्या

Water Problem In Maharashtra : राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कोयना जलविद्युत केंद्रावर यंदा पाणीटंचाईचे सावट आहे. कोयना धरण क्षेत्रात यंदा कमी पावसाची नोंदी झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली असून सध्या ६८ टीएमसी पाणी आहे.
Water Problem
Water ProblemSaam Digital
Published On

Water Problem Koyna

राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कोयना जलविद्युत केंद्रावर यंदा पाणीटंचाईचे सावट आहे. कोयना धरण क्षेत्रात यंदा कमी पावसाची नोंदी झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली असून सध्या ६८ टीएमसी पाणी आहे, तर वीजनिर्मितीसाठीचा पाणीसाठा केवळ २४ टीएमसी आहे. मागील वर्षाचा विचार करता जवळपास सहा टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुढील तीन महिने कोयनेतून वीजनिर्मिती करताना महानिर्मितीला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

महानिर्मितीची एकूण वीजनिर्मिती क्षमता सुमारे १४ हजार मेगावॅटच्या घरात असून त्यांच्याकडून महावितरणला सरासरी आठ-नऊ हजार मेगावॅट एवढ्या विजेचा पुरवठा केला जातो. एकट्या कोयना धरणाची वीजनिर्मिती क्षमता सुमारे १,९६० मेगावॅट एवढी आहे. त्यामधून विजेच्या मागणीनुसार १,९०० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती करता येते, मात्र यंदा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची कमी नोंद झाल्याने तब्बल १०५ टीएमसी एवढी मोठी क्षमता असतानाही धरण केवळ ९४ टीएमसीपर्यंत भरले होते. तसेच एकूण क्षमतेच्या ६७.५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरता येते.

आतापर्यंत महानिर्मितीने सुमारे ४२ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले असून सध्या वीजनिर्मितीसाठीच्या पाण्याचा साठा २४ टीएमसी एवढा कमी आहे. वाढत्या तापमानामुळे पुढील तीन महिन्यांत राज्याची विजेची मागणी वाढते. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यावर मर्यादा येत असल्याची माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्याने दिली.

Water Problem
Manoj Jarange Patil : उद्याचं सगळं ठरणार..आता अवधी नाही; सगेसोयरेच्या मागणीवर मनोज जरांगें ठाम, सरकारला दिला इशारा

परिस्थिती बिघडण्‍याची शक्यता

राज्याच्या विजेच्या मागणीत अचानक वाढ झाल्यास कोळशावरील वीज प्रकल्पातून तत्काळ वीजनिर्मिती वाढवता येत नाही, तेव्हा जलविद्युत प्रकल्पातून तत्काळ वीजनिर्मिती सुरू करून ग्रीडची स्थिरता राखली जाते, मात्र पुढील काळात कोयना धरणातच पाण्याचा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात अचानक विजेची मागणी वाढल्यास तत्काळ वीजनिर्मिती वाढवताना मर्यादा येणार आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडण्याची भीती आहे.

कोयना वीज केंद्रातून महानिर्मितीकडून वीजनिर्मिती केली जात असली तरी कोणत्या वेळी किती वीजनिर्मिती करायची याचे नियोजन महावितरण आणि राज्य भार प्रेषण केंद्राकडून केले जाते, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाणी असल्याने वीजनिर्मिती करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती कोयना वीज केंद्राचे मुख्य अभियंता ए. डी. शिंदे यांनी दिली.

Water Problem
Maratha Reservation: विधेयक मंजूर होताच गुणवर्ते सदावर्तेंनी थोपटले दंड; उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com