Mahad: चवदार तळ्याचं शुद्धीकरण! महाड नगरपरिषदेद्वारे तळ्यातलं पाणी होणार 'चवदार'

Mahad Chavdar Tale Water Purification: पुरामुळे चवदार तळ्यातील पाणी पुराच्या पाण्यामुळे अशुद्ध झाले होते.
Chavdar Tale Water Purification By Mahad NagarParishad
Chavdar Tale Water Purification By Mahad NagarParishadराजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर, रायगड

महाड: 22 जुलै रोजी आलेल्या महापूराने महाडचे ऐतिहासिक चवदार तळे (Chavdar Tale) मातीमिश्रित झाले होते. महाड नगरपरिषदेने तातडीने यंत्रणा लावून चवदार तळे स्वच्छ केले. नगरपरिषदेच्या माध्यमातून तळ्यात बसवलेली बायो रेमीडिशन यंत्रणा (Bioremediation Technology) पुरामुळे (Mahad Flood 2021) निकामी झाली होती. ती काढून पुन्हा नव्याने कार्यन्वित केली असून पाणी शुद्धीकरण (Purification) सुरू करण्यास सुरुवात केली आहे. मार्चपर्यत चवदार तळ्यातील पाणी शुद्ध होईल अशी आशा महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप (Snehal Jagtap, Mahad Nagaradhyaksha) यांनी सामशी बोलताना व्यक्त केली आहे. (water of chavdar tale will be purified by mahad nagar parishad)

हे देखील पहा -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे (Chavdar Tale) सत्याग्रह करून समता आणि समानतेची शिकवण दिली. चवदार तळे हे ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक आहे. लाखो आंबेडकर अनुयायी हे चवदार तळ्याला भेट देत असतात. यावेळी तळ्यातील पाणीही प्राशन करीत असतात. मात्र 22 जुलै रोजी आलेल्या पुराने चवदार तळ्यातील पाणी अशुद्ध झाले होते. शासनाच्या माध्यमातून महाड नगरपरिषदेने आपली यंत्रणा लावून तळ्यातील पाणी उपसा करून गाळ काढून तळे स्वच्छ केले.

Chavdar Tale Water Purification By Mahad NagarParishad
MPSC Mains Exam: MPSC आयोगाने मुख्य परीक्षा पुढे ढकलली

तळ्यातील बायो रेमिडिशन पंप हा पुरामुळे निकामी झाल्याने तो काढून रिपेअर करून स्वच्छ केला आहे. त्याचबरोबर तळ्यातील पाणी शुद्धीकरण ही करण्यास सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण होऊन तळ्यातील पाणी शुद्ध (Water Purification) होणार आहे. त्यामुळे पुन्हा चवदार तळ्याचे पाणी पूर्वीसारखे होणार आहे. असे नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी म्हटले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com