Aurangabad: नववर्षाच्या आगमनाला पाणी कपात; या तारखेपर्यंत चौथ्या दिवशी येणार पाणी

औरंगाबाद शहरात नव्या वर्षापासून म्हणजे उद्यापासून तीन दिवसांआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.
Aurangabad
Aurangabadमाधव सावरगावे, औरंगाबाद

माधव सावरगावे

Aurangabad: औरंगाबाद शहरात नव्या वर्षापासून म्हणजे उद्यापासून तीन दिवसांआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील ६० टक्के वसाहतींना १ जानेवारीपासून तीन दिवसांआड पाणी देण्यात येणार आहे. उर्वरित ४० टक्के वसाहतींना रोटेशननुसार पाच दिवसांआड पाणी देण्यात येईल. १५ दिवस संपल्यावर ६० टक्के वसाहतींना परत पाच दिवसांआड पाणी दिले जाणार आहे. (Latest Aurangabad News)

प्राप्त माहितीनुसार, जायकवाडी धरणाहून १२५ ते १३० एमएलडी पाणी शहरात आणले जाते. औरंगाबाद महापालिकेकडे पाणी साठविण्यासाठी टाक्या नाहीत. त्यामुळे संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देणे शक्य नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाण्याच्या नवीन १० टाक्या युद्धपातळीवर बांधून घेण्यात येत आहेत. हे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर पाणीपुरवठ्यात आमूलाग्र बदल होणार असल्याचे मनपातर्फे खंडपीठात सांगण्यात आले. खंडपीठाच्या आदेशानुसार १ जानेवारीपासून ६० टक्के वसाहतींना तीन दिवसांआड म्हणजेच चौथ्या दिवशी पाणी मिळेल.

Aurangabad
Aurangabad Crime : औरंगाबाद हादरलं! दहावीच्या विद्यार्थीनीवर धाब्यावर नेऊन बलात्कार

पाणी कपात केल्याने याचा औरंगाबादमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागणार आहे. एक दिवस पाणी आले नाही तरी घरात मोठी तारांबळ होते. अशात पालिकेने चक्क चौथ्या दिवशी पाणी सोडणार असल्याचे सांगितले आहे. याने औरंगबादकर नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक नागरिकांनी पाण्याच्या टाक्या बसवण्यासाठी आणि नियमीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी अर्ज केले होते. वारंवार जास्त टाक्यांची मागणी करूनही अतिरिक्त टाक्या बसवल्या नसल्याने ४ दिवस पाण्याशिवाय राहण्याची वेळ आली आहे.

Aurangabad
VIDEO : अरे बापरे! मध्यरात्री ७२ इंचाची जलवाहिनी फुटली; तब्बल ४०० घरात शिरलं पाणी, रस्त्यांना नदीचं स्वरूप

काही दिवसांपूर्वी जायकवाडी धरणातील पाण्यावर फेस आणि तवंग आलेला दिसला होता. औरंगाबादसह जालना जिल्ह्यातील लाखो नागरिकांना याच ठिकाणाहून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. केमिकल मिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा होत आहे. आतापर्यंत पूर्णपणे शुद्ध दिसणारे धरणाच्या पाण्याचा रंग या आठ दिवसात बदलला. मात्र, या तीन दिवसांपासून औरंगाबाद पंप हाऊस आणि जालना पंप हाऊस या ठिकाणच्या पाण्यावर फेस आल्याचे दिसत आहे. अशात धरणाला आलेल्या फेसावर अभ्यास सुरू असताना औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठा कपात केल्याचे म्हटले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com