Washim News : शेतकऱ्यांचे अवयव विकत घ्या! गळ्यात बॅनर, त्यावर अवयवांच्या किंमती; पिककर्जाला कंटाळलेल्या शेतकऱ्याची व्यथा

Washim Farmer Sells Kidney for Money : गळ्यात अवयव विक्रीचं बॅनर लटकवून आपले अवयव विक्रीसाठी वाशिमच्या मुख्य बाजारपेठेत आपण आलो आहोत, अशी उद्विग्न भावना शेतकऱ्याने व्यक्त केली.
Washim Farmers Selling Organs Banner
Washim Farmers Selling Organs BannerSaam Tv News
Published On

मनोज जैसवाल, साम टीव्ही

वाशिम : वाशिम शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात आज एक वेगळं चित्र बघायला मिळालं. पिककर्जाच्या पैशांसाठी शेतकऱ्याने आपले अवयव विक्रीला काढलेत. गळ्यात अवयव विक्रीचं बॅनर लटकवून आपले अवयव विक्रीसाठी वाशिमच्या मुख्य बाजारपेठेत आपण आलो आहोत, अशी उद्विग्न भावना शेतकऱ्याने व्यक्त केली.

देवेंद फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली, आणि आता अजित पवारांनी शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरावं, अस वक्तव्यं केलं. एकीकडे शेतमालाला भाव नाही. कवडी मोल दराने आम्ही आमचा शेतमाल विकला असून, आता आमच्याजवळ पीककर्ज भरण्याकरता विकण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे आज वाशिमच्या पाटणी चौकात आपले अवयव विक्रीसाठी आलो आहे. अशी उद्विग्न भावना शेतकऱ्याने व्यक्त केली.

Washim Farmers Selling Organs Banner
Weather Updates : महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, ऐन उन्हाळ्यात गारपीटीची शक्यता

निवडणुकीपूर्वी सातबारा पूर्ण कोरा करु, अशी घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या अधिवेशनात सातबारा कोरा होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र २८ मार्चला अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज भरावे, अशी घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली. दरम्यान, शेतकरी आणि वेगवेगळ्या संकटातून जात असताना या पीक कर्जामाफीची मोठी अपेक्षा होती. मात्र, अजित पवारांच्या गोष्टीनंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस हा शेतमाल कवडी मोल दरात विकला. आता आपल्यासाठी काहीच नाही या उद्विग्न भावनेतून वाशिमच्या ईडोळी येथील शेतकऱ्याने आपले अवयव विकून आता पीक कर्ज भरावे का? या उद्देशाने वाशिमच्या पाटणी चौकात आपले अवयव विक्रीचं बॅनर टाकून ते आले होते.

Washim Farmers Selling Organs Banner
Chhatrapati Sambhajinagar : राज ठाकरे कडाडले, संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते कामाला लागले; औरंगजेबाच्या कबरीवरुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com