Washim News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली पण बाहेर आलेच नाहीत, तिघांचा दुर्दैवी मृत्यू

3 Youth Died After Drowning In Dam: बकरी ईदचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अडाण धरणावर काही तरुण गेले होते. धरणामध्ये पोहण्यासाठी उतरले पण तिघांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
Washim News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली पण बाहेर आलेच नाहीत, तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3 youth died after drowning in damSaam TV

मनोज जयस्वाल, वाशिम

वाशिमच्या अडाण धरणात (Adan Dam) बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बकरी ईदचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अडाण धरणावर काही तरुण गेले होते. धरणामध्ये पोहण्यासाठी हे तरुण उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा धरणामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तरुण कारंजा शहरातील आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या कारंजा शहरातील काही तरुण अडाण धरणावर बकरी ईदचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास गेले होते. यामधील काही तरुणांना धरणाच्या गेटसमोरील पात्रातील डोहात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. पोहण्यासाठी या तरुणांनी पाण्यात उडी मारली पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा या डोहात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या तिन्ही तरुणांचे मृतदेह पिंपरी फॉरेस्ट येथील गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले आहे.

Washim News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली पण बाहेर आलेच नाहीत, तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri Yellow Alert : रत्नागिरी जिल्ह्याला १९ जूनपर्यंत येलो अलर्ट; चिपळूण तालुक्यात जोरदार पाऊस

धरणामध्ये बुडून रेहान खान हफीज खान (वय १९ वर्षे), साईम करीम शेख (वय १७ वर्षे), इस्पान अली अर्षद अली (वय १५ वर्षे) या तिघांचा मृत्यू झाला. हे तिघेही कारंजामधील भारतीपुरा येथे राहत होते. या तिघांचेही मृतेदहा धरणातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मुस्लिम बांधवांचा आनंदाचा सण असताना तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे.

Washim News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली पण बाहेर आलेच नाहीत, तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri Rain Video: रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलं, खेड शहरातील गांधी चौकात पूर सदृश्य परिस्थिती

दरम्यान, वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील दस्तापूर गावाजवळील धरणात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला. मंगरूळपीर येथील ४ मुलं धरणावर पोहायला गेले होते. त्यापैकी मोहम्मद हुजेफ मोहम्मद रियाज्जुद्दीन (वय १२ वर्ष ) याला धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धरणावर मोठया संख्येने लोकांनी गर्दी केली होती. अथक प्रयत्नानंतर गाळात अडकलेल्या मोहम्मदचा मृत्यूदेह बाहेर काढण्यात यश आले.

Washim News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली पण बाहेर आलेच नाहीत, तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Pune Tragedy : एकाच कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू; ती काही मिनिटं आणि पती-पत्नी, मुलासोबत घडलं भयंकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com