Washim : तरुणांसह अल्पवयीन मुले पेन हुक्क्याच्या विळख्यात

मागेल तिथे सहज उपलब्ध होत असल्याने हा 'हुक्का पेन' विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये आढळून येत आहे.
Hookah Pen
Hookah PenSaamTV News

वाशिम : आजपर्यंत तंबाखू, गुटखा, खर्रा, सिगारेटचे व्यसन करताना आपण तरुणांना पाहतोय. मात्र, वाशिमच्या (Washim) कारंजा तालुक्यातील व्यसनाधीन तरुण यापुढे जात गांजासह हुक्का या अमलीपदार्थांकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे. कधी काळी मोठ्या शहरात असलेला हुक्का आता तालुका पातळीवर येऊन पोहोचला असून, हा अवैध व्यवसाय छुप्या मार्गाने चांगलाच फोफावत आहे. हुक्का पेन (Hookah Pen) कारंजा तालुक्यात सहज उपलब्ध होत असल्याने महाविद्यालयीन तसेच अल्पवयीन मुले अमली पदार्थांच्या आहारी जाऊन नशा करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी (Police) याची गांभीर्याने दखल घेऊन हा हुक्का कारंजातून हद्दपार करावा अशी मागणी होत आहे.

हे देखील पहा :

शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. मात्र, कारंजा (Karanja) शहरात हुक्का शौक पूर्ण करण्यासाठी हुक्का पार्लरची गरज नसून, मागेल तिथे सहज उपलब्ध होत असल्याने हा 'हुक्का पेन' विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये आढळून येत आहे. हुक्का पेन आणि त्याकरिता लागणारे लिक्विड शहरातील काही खास तस्करांद्वारे अवैध धंद्याच्या ठिकाणी सहज उपलब्ध होत असल्याने व्यसनाधीन मंडळी निर्जनस्थळी बसून, आपला शौक पूर्ण करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळं संबंधित विभागाने याकडे लक्ष्य देऊन वेळीच या अमली पदार्थांविरोधात मोहीम राबवावी अशी मागणी सामाजिक संघटनासह नागरिक करीत आहेत.

Hookah Pen
रशिया-युक्रेन युद्धात मुलांचं शिक्षणाची लागली वाट; पैसे अन् वर्ष गेले वाया!
Hookah Pen
कांदा चिरताना आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून सातवीच्या विद्यार्थ्याने बनविला स्मार्ट चाकू!

हुक्का पेन दिसायला साध्या पेन सारकाच असून, या हुक्का पेनच्या वरील भागात छिद्र असलेले निप्पल असून, त्यामधून नशा केली जाते. या हुक्का पेन साठी लागणारे लिक्विड 200 रुपये किंमतीचे असून, संपूर्ण पेनची किंमत 500 रुपयांच्या आसपास असल्याची माहिती आहे. कारंजा शहरात तरुण मंडळींसह अल्पवयीन मुले या अमली (Narcotics) पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करीत आहेत. दरम्यान, होळी जवळ आल्यामुळे हुक्का पेन पार्ट्या मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभाग तसेच पालकांनी आपली मुले हुक्का पितात का याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com