Washim Fire News : रात्री सर्व गाढ झोपेत असताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; आगीत दोन घरं जळून खाक

Fire News : घरासह शेजारी मोहब त्र्यंबक पुंड यांच्या घरातील लाखो रुपयांचं संसारोपयोगी साहित्य 110 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालं आहे. यामुळे त्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय.
Washim Fire News
Washim Fire News Saam TV

मनोज जयस्वाल, वाशिम.

Washim :

वाशिमच्या वाडी रायताळ गावात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन घरं देखील जळून खाक झालीत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Washim Fire News
Washim News : दुचाकीवर कारवाईचा बडगा; वाशिम शहर पोलिसांकडून सत्तर हजाराचा दंड वसूल

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाडी रायताळ गावात ही घटना घडली आहे. गावातील सुभाष सदाशिव पुंड यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत त्यांच्या घरासह शेजारी मोहब त्र्यंबक पुंड यांच्या घरातील लाखो रुपयांचं संसारोपयोगी साहित्य 110 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालं आहे. यामुळे त्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय.

सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली तेव्हा सुभाष पुंड यांचं घर बंद होतं. त्यामुळे येथे जीवितहानी टळली. रात्रीच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीचा मोठा भडका उडाला आणि आगीनं रौद्र रूप धारण केलं. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्यानं त्यावर नियंत्रण मिळवता आलं नाही.

रिसोड पोलीस आणि नगर परिषदेची अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन घरं जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

गावांमध्ये सिलिंडरचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात देखील अशीच एक घटना घडली होती. चिखली शहरातील गजानन नगरमधील रहिवासी गौरव कुलकर्णी यांच्या राहत्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि लगेचच आगीवर नियंत्रण मिळवले.

Washim Fire News
Sambhajinagar Crime News : अवैध गोवंशाची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक, 7 जनावरांची सुटका; वाहन पाेलिसांच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com