Washim Crime: बापानेच केली लेकीची हत्या; तुकडे करून...

पोलीसांना या क्लिष्ट प्रकरणाचा उलगडा करण्यात यश
Crime News
Crime NewsSaamTv

मनोज जयस्वाल, वाशिम

Washim News Today: वाशिमच्या मालेगाव शहराजवळ चार दिवसांपूर्वी एका शेतात खताच्या गोणीत मानवी सांगाड्याचे अवशेष सापडल्याने परीसरात खळबळ उडाली होती. दरम्यान पोलीसांना या क्लिष्ट प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी यात एका व्यक्तीला अटक केली आहे. हे मानवी अवशेष एका महीलेचे असून मारेकरी हा महिलेचा वडील असल्याची माहिती समोर आली आहे. मुलगी ही मंदबुद्धी असल्याने तीच्या वागणुकीमुळे त्रास होत होता आणि त्यामुळे मुलीची हत्या केल्याची कबुली बापाने दिली आहे.  (Latest Marathi News)

Crime News
Coal Mine Explosion: नागपूरच्या सिल्लेवाडा कोळसा खाणीत स्फोट, 11 कामगार जखमी

मालेगाव पोलीस (Police) स्टेशन परिसरात गेल्या सहा महिन्यापासून अनेक मिसिंग केसच्या संदर्भात माहिती गोळा करण्यात आली. त्यावरून शहरातील वेगवेगळ्या भागातून तीन मुली बेपत्ता होत्या. मात्र, एक मुलगी बेपत्ता असूनही तिच्याविषयी कोणत्याही प्रकारची मिसिंग केस दाखल नव्हती.

यावर मालेगाव (Malegaon) पोलिसांनी अधिक तपास करून मालेगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेजवळ असणाऱ्या मुख्तार खान मोहम्मद खान वय वर्ष 60 याला ताब्यात घेतले. सुरुवातीला सदर आरोपींनी उडवा उडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. (Washim News)

Crime News
Wrestlers Protest: कुस्तीपटूंचा जंतरमंतर ते इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च; ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी

मात्र सर्व तांत्रिक बाबी व फॉरेन्सिक टीमच्या मार्गदर्शनामुळे आरोपीला पोलिसांनी खाक्या दाखविताच आरोपीने आपली मुलगी मंदबुद्धी असल्यामुळे आणि तिचा त्रास होता असल्यामुळे आपणच मुलीची हत्या केल्याचे कबूल दिली.

इतकेच नाही तर तिचे प्रेत घरात पुरले एक महिन्यानंतर घरात दुर्गंधी येत असल्याने पुरलेले प्रेत बाहेर काढून सांगाडा दोन गोण्यात भरून गावा बाहेर फेकुन दिला. यावरून मालेगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपासाकरिता अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com