मुसळधार पावसाचा इशारा; उत्तर महाराष्ट्राला ‘ऑरेंज अलर्ट’

महाराष्ट्र्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती
मुसळधार पावसाचा इशारा; उत्तर महाराष्ट्राला ‘ऑरेंज अलर्ट’
मुसळधार पावसाचा इशारा; उत्तर महाराष्ट्राला ‘ऑरेंज अलर्ट’Saam Tv
Published On

पुणे - आज १८ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्राला Maharashtra पावसाचा Rain ‘ऑरेंज अलर्ट’ Orange Alert देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह Mumbai ११ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ Yellow Alert देण्यात आला आहे. महाराष्ट्र्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.

मात्र, आतापुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण यासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दिल्ली, हददोई, देहरी, रांची वाराणसी, फिरोजपूर, हिस्सार या दरम्यान आहे.

बंगाल आणि ओरिसाच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा सक्रिय झाले आहेत. तर हे क्षेत्र दक्षिण ओरिसा, उत्तर आंध्र प्रदेश आणि आसपासच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या दोन दिवसांत चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची स्थिती आहे अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याचा वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुसळधार पावसाचा इशारा; उत्तर महाराष्ट्राला ‘ऑरेंज अलर्ट’
कोरोना काळात हत्याकांड घडवण्याचे काम भाजपने केले - नाना पटोले

आज म्हणजेच १८ ऑगस्ट २०२१ रोजी खानदेश व मराठवाड्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि औरंगाबाद या जिल्ह्यांना पावसाचे ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आले आहे. तसेच येत्या काही दिवस पावसाचा जोर कमी-अधिक स्वरूपात कायम राहील. पावसाच्या उघडिपीमुळे राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. तापमानाचा पारा गेल्या काही दिवस सातत्याने २६ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com